ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 14 - पाश्चात्य संस्कृतीत देखाव्याला महत्त्व असून भारतीय संस्कृतीत आईच्या ममत्वाला महत्त्व असल्याचे प्रा़ माधव कदम यांनी सांगितल़ेमातृदिनानिमित्त आईबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, आई मायेचा अथांग सागर आहे. आईची माया ही कशातच मोजता येत नसून ही ज्याला मिळाली तो सर्वात नशिबवान असल्याचे त्यांनी सांगितल़े आईच्या मायेचा ओलावा हा तिच्या लेकरांच्या सदैव अवती भोवती असल्याचेही त्यांनी सांगितल़े पुढे बोलताना प्रा़कदम म्हणाले की, मुलांनी सदैव आपल्या आईचे ऋण लक्षात ठेवण्याची आवश्यकता असून या कलयुगात आईची सेवा हे परमर्धम असल्याचेही त्यांनी सांगितल़े शिक्षण क्षेत्रात असल्याने नव्या पिढीला आईचे महत्व सांगण्याची आपल्याला सुवर्णसंधी मिळाली असल्याचेच आपण मानत असल्याचे त्यांनी सांगितल़े
आईचे ममत्व मिळणारे जगातील सर्वात नशीबवान
By admin | Published: May 14, 2017 6:42 PM