ऑनलाईन लोकमत
अडावद,दि.29 - इंदिरानगर भागातील अंगणवाडीतील बालकांना देण्यात आलेल्या पोषण आहारात किडा आढळल्याने, पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवार 29 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. यावेळी अंगणवाडीत पालकांनी गर्दी केली होती.
इंदिरानगर भागात असलेल्या अंगणवाडीत आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास खिचडीचे विद्याथ्र्यांना वाटप करण्यात आले. विद्याथ्र्यांनी काही आहार तेथेच खाल्ला. काही विद्याथ्र्यानी आहार घरी नेला. यश संतोष साबळे या अडीच वर्षाच्या मुलाच्या प्लेटमध्ये मोठा किडा असल्याचे एका महिलेला दिसले. त्या महिलेने सदर प्रकार अंगणवाडीतील सेविका, मदतनिस व पालकांच्या निदर्शनास आणुन दिला. अंगणवाडीतील पुरक पोषण आहारात किडे निघाल्याची वार्ता गावात वा:यासारखी पसरताच महिला व नागरिकांनी अंगणवाडीत धाव घेत गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच अंगणवाडीच्या पर्यवेक्षक नंदा सोनवणे, सचिन महाजन, हरिष पाटील, अलाउद्दीन तडवी, श्रीधर तायडे, बाळु महाजन, संतोष साबळे, जुनेद खान, भगवान कोळी, ज्ञानेश्वर बाविस्कर, रवींद्र बारी यांनी अंगणवाडीला भेट देत घटनेची माहीती जाणुन घेतली.
यावेळी उपस्थित पालक वर्गाने अंगणवाडी पर्यवेक्षिका नंदा सोनवणे यांच्याकडे संबधितांवर कारवाईची मागणी केली.
पोषण आहारामध्ये किडा निघाल्यानंतर या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. पोषण आहार पुरविणारा बचत गट तसेच संबंधित कर्मचा:यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- नंदा सोनवणे,
पर्यवेक्षिका, अंगणवाडी, अडावद