जळगाव : स्वा.वि.दा.सावरकर, स्वामी विवेकानंद यांचे विचार आचरणात आणून शुभंकर सुशील अत्रे (वय २२) यांनी ‘इतिहासाच्या पाऊलखुणा- भाग ३’ या इतिहास-संदर्भग्रंथात सहलिखाण केले असून लोकमान्य टिळक यांच्या सविस्तर चरित्राचे लेखन सुरू आहे. त्याशिवाय विवेकानंद, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस व बाबासाहेब आंबेडकर या विभूतींवर पुणे-मुंबई, जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी व्याख्याने दिली आहेत.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘युवकानंद’ या स्वामी विवेकानंदांवरील कार्यक्रमाचे सहलेखन व प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांतून काव्ये रचली आहेत. वैयक्तिक संग्रहात भालबा केळकरांच्या ‘समग्र महाभारता’च्या खंडांपासून ते एडवर्ड गिबनच्या डेकलाईन ॲण्ड फॉल ऑफ रोमन एम्पीरीरच्या खंडांपर्यंत साधारण ५ हजारांपर्यंत ग्रंथसंपदा त्याच्याकडे आहे.
कायद्याचे शिक्षण
शुभंकर सुशील अत्रे (वय २२) हा तरुण ज्येष्ठ विधीज्ञ सुशील अत्रे यांचा मुलगा आहे. सध्या कायद्याचे शिक्षण घेत आहे. महाविद्यालयीन शिक्षण आधी पुणे व आता जळगाव येथे सुरू आहे. इतिहास हा त्याचा अभ्यासाचा आवडीचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज, थोरले माधवराव पेशवे, चाणक्य, १८५७चा स्वातंत्र्यसंग्राम, विवेकानंद, लो. टिळक, स्वा. सावरकर, चंद्रशेखर आझाद व काही अल्पज्ञात क्रांतिकारक, इ. विषयांवर वेळोवेळी लेखन केले आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘युवकानंद’ या स्वामी विवेकानंदांवरील कार्यक्रमाचे सहलेखन व प्रत्यक्ष सहभाग आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांतून काव्ये रचली आहेत.
कोट...
युवकांनी सगळ्या महापुरुषांची नजर आपल्यावर आहे याची जाणीव कायम असू द्यायला हवी. तारुण्याच्या पेटत्या मशालीने देशाचे भविष्य उजळून टाका! हे करताना कधी स्वतःच्या क्षमतेवर शंका आली, तर याच विभूतींचे चरित्र अभ्यासा.
- शुभंकर अत्रे, जळगाव