जळगाव : झेरॉक्स व केशकर्तनालय दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात येऊन दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव ॲड. जमिल देशपांडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
शासकीय कामे, नोकरी अर्ज, बँकेचे खाते उघडणे, शासकीय मदत लाभ, विमा कामे, आरोग्य विषयक औषधी कागदपत्रे या सर्व कामांकरिता विविध कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींची आवश्यकता असते. मात्र, दोन महिन्यांपासून झेरॉक्स दुकाने बंद आहेत. त्याकरिता नागरिक वणवण भटकत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे केशकर्तनालयेदेखील बंद आहेत. केशकर्तनालय चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या दुकानांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन १ जूनपासून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.