जळगाव : पंचायत समितीच्या सभापतीपदी नशिराबाद गणातील भाजपाच्या सदस्या यमुनाबाई रोटे तर उपसभापतीपदी शिवसेनला समर्थन दिलेल्या भोकर गणातील सदस्या शीतल कमलाकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. पं.स.मध्ये पाच सदस्यांसह व दोन अपक्षांची साथ असल्याने शिवसेना बहुमतात आहे. पण सभापतीपदाचे आरक्षण अनुसूचित जाती (महिला) या प्रवर्गासाठी राखीव असल्याने या प्रवर्गातून फक्त भाजपाच्या यमुनाबाई रोटे या निवडून आलेल्या आहे. त्यामुळे नियमानुसार रोटे यांना या पदाची संधी भाजपाचे बहुमत नसताना मिळाली. मंगळवारी याबाबतची प्रक्रिया पं.स.च्या सभागृहामध्ये पार पडली. पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी जलज शर्मा होते. सकाळी 11ते 1 यादरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ होती. त्यानंतर माघारीसाठी वेळ देण्यात आला. सभापती व उपसभापती या दोन्ही पदांसाठी अनुक्रमे यमुनाबाई व शीतल पाटील यांचेच अर्ज प्राप्त झाले. इतर कुणाचेही अर्ज न आल्याने निवड बिनविरोध झाली. नशिराबाद येथे जल्लोषआमचा नशिराबाद येथील वार्ताहर कळवितो की, पंचायत समितीचे सभापतीपद नशिराबाद गणातील भाजपच्या उमेदवार यमुनाबाई रोटे यांना मिळाल्याने विजयी रॅली काढून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला़ नूतन सभापती यमुनाबाई रोटे यांनी भवानीमातेचे दर्शन घेतल़े तसेच बौध्द विहारात जाऊन तेथे नतमस्तक होऊन गणातील विकासकामांचा संकल्प केला़ बसस्थानकापासून रॅलीला सुरुवात झाली़ जि़प़सदस्य लालचंद पाटील, पंचायत समिती सदस्या जागृती चौधरी, योगेश पाटील हे उपस्थित होत़े ठिकठिकाणी सभापतींचे औक्षण तसेच स्वागत करण्यात आल़े माजी खासदार वाय़जी़महाजन यांची भेट घेऊन रोटे यांनी आशीर्वाद घेतल़े ग्रा़पं़सदस्य अनिल पाटील, मोहन येवले, राजू रोटे, रवींद्र पाचपांडे, सचिन महाजन उपस्थित होत़ेगवळे यांच्या याचिकेवर 2 एप्रिल रोजी कामकाजसभापतीपदी विराजमान झालेल्या यमुनाबाई दगडू रोटे यांची पं.स.सदस्यपदी झालेली निवड ही अयोग्य असल्याबाबतची याचिका रोटे यांच्याविरुद्ध नशिराबाद गणात पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नथाबाई गवळे रा.कंडारी यांनी जिल्हा व सत्र न्यायालय व औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपिठात दाखल केली आहे. रोटे या अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव गणातून यमुनाबाई रोटे या नावाने निवडून लढवून विजयी झाल्या, पण त्यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र हे यमुनाबाई गायकवाड असे आहे. 2010 च्या नशिराबाद ग्रा.पं. निवडणुकीत यमुनाबाई रोटे यांनी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव जागेवर निवडणूक लढविताना रोटे यांनी आपली जात नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून नमूद केली, असे मुद्दे गवळे यांनी याचिकेत मांडले आहेत. या याचिकेवर जिल्हा न्यायालयात 2 एप्रिल रोजी कामकाज आहे. निवडीनंतर अभिनंदनदोघांच्या निवडीनंतर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व आमदार सुरेश भोळे हे पं.स.मध्ये नवीन पदाधिका:यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. गुलाबराव पाटील यांनी पं.स.सभापती दालनात जाऊन उपसभापती शीतल पाटील यांचे अभिनंदन केले. नेते एकत्र मात्र..सेना व भाजपाचे नेते पं.स.च्या आवारात एकत्र आले, पण कुठलाही संवाद या नेत्यांमध्ये झाला नाही. सहकार राज्यमंत्री गुलाबराव यांनी मात्र सभापती रोटे यांना पुष्पगुच्छ दिला. थोडय़ा वेळानंतर भाजपा व सेनेचे पदाधिकारी पं.स.मधून निघून गेले. कामाची अपेक्षानिवडीनंतर प्रांत जलज शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, आदिवासी योजनांच्या कामांबाबत फारशी प्रगती दिसून येत नाही. पण नव्या पदाधिकारी, सदस्य यांनी आदिवासी बांधवांसह इतरांसाठीच्या योजनांवर लक्ष देऊन काम करायला हवे.
पं.स.सभापतीपदी यमुनाबाई रोटे, उपसभापतीपदी शीतल पाटील
By admin | Published: March 15, 2017 12:40 AM