यावल: बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कोरोना संसर्ग विषयक आढावा बैठक सुरू असताना शहरातील शिवभोजन केंद्राचा ठेका का मिळाला नसल्याच्या कारणावरून तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या दालनात एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्ता पुंडलीक बाजीराव बारी यांंनी अनाधिकृत प्रवेश करीत कुवर यांना शिवीगाळ केल्याने बारी यांचे विरूध्द येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येथील तहसीलदार कुवर यांचे दालनात ा गटविकास अधिकारी निलेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बºहाटे, ग्रा. रु. वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला व संबधितांची तालुक्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करणे व विविध उपाययोजनेवर बैठक सुरू असतांना असतांना पुंडलीक बारी यांनी आरडा-ओरड करीत दालनात प्रवेश करत तहसीलदार कुवर यांना एकेरी भाषेत व शिवीगाळ करत शिवभोजनासाठीचा माझा अर्ज डावल्याबाबत तुम्ही समाधानकारक उत्तर दिले नाही, असे म्हणत टेबलवर बुक्के मारून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. याबातची तक्रार तहसीलदार यांनी दिल्यावरुन येथील पोलीस ठाण्यात बारी यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. नि. अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार जितेंद्र खैरनार पुढील तपास करीत आहेत.----------------------कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलनया घटनेच्या निषेधार्थ येथील निवासी नायब तहसीलदार व कर्मचा-यांनी गुरुवारी काळया फिती लावून निषेध व्यक्त केला. संंशयीत आरोपीस जो पर्यंत अटक करीत नाही, तो पर्यंत काम बंद राहणार असल्याचा निवेदनाद्वारे इशारा दिला आहेप्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले याना कर्मचाऱ्यांनी निवेदन सादर करीत सायंकाळी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांचेकडे निवेदन सादर करणार अकसल्याचे निवासी तहसीलदार पवार यांनी सांगीतले.
शिवभोजन केंद्राचा ठेका न दिल्याने यावल तहसीलदारांना शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 11:04 PM