भुसावळ, जि.जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील यावल नाक्यासह वरणगाव नाका आणि नवोदय विद्यालयाजवळ २४ तास वाहनांच्या तपासणीसाठी स्थिरपथक नियुक्त करण्यात आले असून, चार भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनर्स व फलक जप्त करण्यात आले आहेत. तहसील कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून, नागरिकांना तेथे जावून तक्रारी करता येणार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मीडियावर उमेदवारांचा प्रचार व प्रसार करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे.तपासणीदरम्यान छायाचित्रण होणारसभांची माहिती घेणे, तक्रारींचे निवारण अशी जबाबदारी फिरत्या पथकांकडे सोपवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे, अशा सूचना प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी दिल्या आहेत.स्थिर पथक, फिरते पथकासोबत चित्रीकरण आणि छायाचित्रकारांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. भरारी पथकात प्रशासनाच्या एका कर्मचाºयासोबत तीन पोलीस व एक व्हिडिओग्राफर असणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार कायद्याचे पालन करून पोलिसांनी वाहनांची तपासणी करावी. त्याचप्रमाणे फिरत्या पथकांनी सतर्क राहून आपली जबाबदारी सुरळीत पार पाडावी, अशा सूचना प्रांताधिकाºयांनी दिल्या आहेत. सर्व विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.सोशल मीडियावर करडी नजरनिवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर उमेदवाराचा प्रचार व प्रसार करणाºया तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाºयांवर प्रशासनातर्फे करडी नजर ठेवली जाणार आहे. निवडणुकीच्या काळात अफवा पसरवल्यास वा आक्षेपार्ह मजकूर टाकून समाजात तेढ पसरवणारा मजकूर टाकल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भुसावळात यावल नाका, वरणगाव नाका अन् ‘नवोदय’जवळ ‘चेक पोस्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 3:32 PM
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज झाले आहे.
ठळक मुद्देझेंडे, बॅनर्ससह फलक हटवले तहसील कार्यालयात आचारसंहिता कक्ष सोशल मीडियावर प्रशासनाची नजर