शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

यावल पोलीस ठाण्याला यात्रेचे स्वरूप

By admin | Published: March 09, 2017 11:48 PM

शांतता राखण्याचे नागरिकांना आवाहन : दुसरा वार चुकवला, झटापटीनंतर आरोपी पकडला

यावल : सामाजिक  कार्यकर्ते तथा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान यांच्यावर संशयित आरोपी दुसरा वार करण्याचा प्रयत्नात असतानाच दाखवलेल्या सतर्कता व जमावाच्या हिंमतीमुळे त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या अन्यथा हाजी शब्बीर खान यांना अधिक दुखापत होण्याची भीती होती़दरम्यान, या घटनेनंतर आरोपीला पाहण्यासाठी यावल पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती़ पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आह़े भर चौकात केला हल्लाशहरातील गजबजलेल्या नगिना चौकातून  हाजी शब्बीर खान मोहम्मद खान (73) हे नेहमीप्रमाणे केळी ग्रुपवर जात असताना  इस्लामपुरा भागातील रहिवासी रफिक खान निसार खान (वय 35) बेसावध असतानाच पाठीमागून चाकूहल्ला केला़ हल्लेखोर दुसरा वार करण्याच्या प्रय}ात असतानाच त्यांनी त्यास पकडल़े या वेळी उभयंतांची झटापटही झाली़ चौकातील नागरिकांनी धावत येऊन हल्लेखोरास तत्काळ पकडल़े यात हाफिज खान सोहेब खान या युवकाच्या  डाव्या बाजूच्या खांद्यावर त्याने वार केला. मात्र नागरिकांची मोठी संख्या असल्याने हल्लेखोराचे काही एक चालले नाही. नागरिकांनी त्यास   पकडून  पोलिसांच्या ताब्यात दिले.  शहर शांततेसाठी सदैव तत्पर कोणत्याही धर्माचा धार्मिक उत्सव असो, हाजी शब्बीर खान हे   उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी हिरिरीने भाग घेतात. शिवजयंती, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, या उत्सवात ते सहभागी होऊन शेवटर्पयत ते मिरवणुकीत थांबून उत्सव पार पाडतात.  संपूर्ण मुस्लीम समाजाच्या शांततेची हमी हाजी शब्बीरखान स्वत: घेतात. सर्व धर्मीयांचे ऐक्य व शांतता अबाधित राहावी हा त्यामागचा त्यांचा उद्देश असल्याने सर्व धर्मीयांसह  शासन दरबारी त्यांना आदराचे स्थान आहे. कोणत्याही  उत्सवापूर्वी  शांतता समितीची बैठक असो हाजी शब्बीरखान यांचा शब्द हा परवलीचा मानला जातो. त्यामुळे     त्यांच्यावरील  हल्ल्याचे वृत्त कळताच शहरातील नागरिकांनी पोलीस ठाणे व दवाखान्यात धाव घेतली. जखमी असूनही शहराची चिंता जखमी झाल्यानंतर त्यांना स्थानिक खासगी दवाखान्यात उपचारासाठी आणले  असता  डॉक्टरांनी त्यांना तत्काळ पुढील उपचारासाठी भुसावळ येथे  हलविण्यास सांगितले. मात्र माङया पाठीमागे शहराची शांतता बिघडेल, असे सांगत त्यांनी स्थानिक डॉक्टरांनाच इलाज करण्याची विनंती केली़ शहरातील सर्व प्रतिष्ठितांनी शांततेची हमी घेतल्यानंतरच  ते पुढील उपचारासाठी भुसावळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. अनेकांची भुसावळ येथे धाव घटनेचे वृत्त कळताच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जि़प़सदस्य प्रभाकर सोनवणे, अमोल भिरुड  यांनी  हाजी शब्बीरखान यांना तत्काळ रुग्णालयात हलविले. माजी आमदार रमेश चौधरी, जि़प़ सदस्य आर.जी. पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, नगरसेवक असलम शेख , जि़प़चे माजी  सदस्य वसंतराव महाजन, फैजपूर उप अधीक्षक अशोक थोरात यांनी रुग्णालयात जाऊन प्रकृतीची विचारपूस केली़ संशयित आरोपी रफिक खान निसार खान याच्याविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रय} केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक  बळीराम हिरे, सहायक पोलीस निरीक्षक  योगेश तांदळे, पो.कॉ. संजीव चौधरी तपास करीत आहेत. (वार्ताहर)हा तर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न4शब्बीर खान यांच्यावर हल्लेखोराने पाठीवर चाकू मारला, मात्र सुदैवाने दुसरा वार करण्यापूर्वीच तो चुकवल्याने                  अनर्थ टळला़ पाठीमागे किडनीच्या अगदी जवळ जखम असल्याचे शब्बीर खान यांनी सांगितल़े आपल्याविषयी आरोपीच्या मनात कुणीतरी गैरसमज निर्माण करून दिल्याने हा प्रकार घडल्याचे त्यांनी फिर्यादीतही नमूद केले आह़े  धार्मिक वादातून हल्ला झाल्याचे पोलिसांचे मत4हल्लेखोर रफिक खान निसार खान हा सुन्नी जमातीचा असून हाजी शब्बीर खान तबलिकी जमातीचे आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वी हाजी शब्बीर खान यांच्या पुढाकाराने  यावल येथे तबलिकी इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा राग हल्लेखोराच्या मनात अजूनही खदखदत होता. यावलच्या भूमीत तबलिकी इज्तेमाचे आयोजन का केले असे तो बडबडत असल्याचे पोलिसांनी सांगितल़े या कारणावरुन आरोपीने हल्ला केल्याचा पोलिसांचा कयास आह़े या हल्ल्यामागे अजून कोणी आहे ? का याचासुद्धा पोलीस तपास करीत आहेत.