चुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : यावल शहरातील श्री साई भक्तांकडून सालाबादाप्रमाणे यावर्षीदेखील रविवारी यावल ते शिर्डी पायी पालखी रवाना झाली.सकाळी श्री साईबाबा मंदिरातून शहरात शोभायात्रा काढत पायी पालखी दुपारी शिर्डीकडे रवाना झाली. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन व भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आले. रस्त्यात आठ दिवस मुक्काम केल्यावर ३१ डिसेंबर रोजी पालखी शिर्डीत दाखल होणार आहे.यावल शहरात मेन रोडावर श्री साईबाबांचे मंदिर आहे. या मंदिराच्या वतीने दरवर्षी डिसेंबर महिन्यात यावल ते शिर्डी पायी पालखी नेण्यात येते, तर या वर्षीदेखील रविवारी सकाळी श्रीच्या मूर्तीचा अभिषेक, मंगलस्नान, पादूका पूजन केले. यानंतर सकाळी ८.३० वाजेला ध्वजपूजन करून पालखी पूजन नगराध्यक्षा सुरेखा कोळी, सेनेचे जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, नगरसेवक अभिमन्यू चौधरी, धीरज चौधरी, दिलीप वाणी, सागर चौधरी यांच्यासह पालखी उत्सव समितीचे अध्यक्ष संजय गोविंद पाठक, पालखी अध्यक्ष हिरालाल रघुनाथ सोनार, महेश भगवान महाजन, अनिल कोळी, हर्षल मोरे, नीलेश सूर्यवंशी, गणेश सुरळकर, राहुल कोळी, दीपक वाघ, बाळा कोलते, लक्ष्मण सपकाळे, जीवन महाजन, संतोष खर्चे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.श्री साईबाबा मंदिराजवळ भाविकांना प्रसाद म्हणून दूध वितरित करण्यात आले. श्री साईबाबांच्या पादुका पूजन करून सवाद्य शहरातून मिरवणूक काढण्यात आली. दुपारी शहरातून पालखी चोपड्याकडे रवाना झाली. पालखीचा रात्रीचा मुक्काम धानोरा, ता.चोपडा येथे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चोपडा, वेले, अमळनेर, फागणे, झोडगे, चौंडी जळगाव, सावरगाव, कोपरगाव असा ठिकठिकाणी मुक्काम करीत ३१ डिसेंबर रोजी श्री साईबाबा मंदिरात शिर्डीत पालखी दाखल होईल.
यावल येथूून साईभक्तांतर्फे पालखी शिर्डीकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 6:36 PM
यावल शहरातील श्री साई भक्तांकडून सालाबादाप्रमाणे यावर्षीदेखील रविवारी यावल ते शिर्डी पायी पालखी रवाना झाली.
ठळक मुद्देश्रीच्या मूर्तीचा अभिषेक, मंगलस्नान, पादूका पूजनासह विविध कार्यक्रमयावल शहरातून निघाली भव्य मिरवणूक३१ डिसेंबर रोजी पालखी शिर्डी येथे पोहोचणार