यावल : आदिवासी भिल एकता मंचच्या वतीने येथील नगर परिसरातील रेणुकामाता मंदिराजवळ प्रांगणात आदिवासी दिन उत्साहात साजरा झाला. यात आदिवासी क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी आदिवासी भिल एकता मंचचे प्रदेश अध्यक्ष एम. बी. तडवी, यावल तहसीलचे निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, यावलचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेते अतुल पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. देवकांत पाटील, आदिवासी सेनेचे तालुकाप्रमुख हुसैन तडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज एम. तडवी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील यांच्यासह मंचचे राज्य उपाध्यक्ष सलीम तडवी, राज्य सदस्य समीर तडवी, जिल्हा कार्यध्यक्ष फिरोज तडवी, जिल्हा उपाध्यक्ष कालू तडवी, रबील तडवी, जिल्हा संघटक कुरबान तडवी, तालुका अध्यक्ष सरदार तडवी, जिल्हा सचिव रोहित तडवी, दीपक मगरे आदी पदधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, खाज्या नायक, रानी दुर्गावती, तंट्या मामा भिल अशा थोर समाज क्रांतिवीर व आदिवासी बांधवांसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या थोर महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
स्वातंत्र्याच्या अनेक वर्षांनंतरही आदिवासी बांधवांच्या वाड्या-वस्तीवर अद्यापही शासकीय योजना लाभ मिळत नसल्याची खंत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी इतरही मान्यवरांची भाषणे झाली.