शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

यावलला संध्या महाजन सभापतीपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2017 12:11 AM

काँग्रेसचा टेकू : भाजपाला बंडखोरीचा फटका, ईश्वरचिठ्ठीत काँग्रेसचा उपसभापती

यावल : पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपा  सदस्या संध्या महाजन यांनी बंडखोरी करत काँग्रेसच्या सहकार्याने व नशिबाच्या जोरावर सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे भाजपा समर्थक अपक्ष उमेदवार पल्लवी चौधरी  यांना  पराभव स्वीकारावा लागला़ भाजपाच्या  संध्या महाजन ईश्वर चिठ्ठीने सभापतीपदी विराजमान झाल्या तर दुसरीकडे उपसभापतीपदावरही काँग्रेसचे उमाकांत रामराव  पाटील यांचीही  ईश्वर चिठ्ठीने निवड झाल्याने काँग्रेसचे दैव बलवत्तर ठरले आह़े दरम्यान, भाजपाने पल्लवी चौधरी यांच्या नावाचा व्हीप काढला होता. मात्र  महाजन यांनी तो व्हिप झुगारत काँग्रेसच्या सहकार्याने  उमेदवारी दाखल केली, हे विशेष !ईश्वर चिठ्ठीने झाला फैसलापाच सदस्य निवडून आलेल्या भाजपाने अपक्ष उमेदवार पल्लवी चौधरी यांना सभापतीपदाची संधी देऊ केली होती, तर संध्या महाजन यांनी त्यास विरोध दर्शवला होता. त्यांनी भाजपाशी बंडखोरी करीत काँग्रेसच्या चार सदस्यांना सोबत घेत मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला तर भाजपातर्फे पल्लवी चौधरी यांनी अर्ज दाखल केला़ हात उंचावून झालेल्या मतदानात दोघांनाही सम-समान म्हणजे प्रत्येकी पाच मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीचा निर्णय झाला़  योगेश राजेंद्र पाटील (वय 10) या बालकाने काढलेल्या चिठ्ठीत संध्या महाजन यांचे नाव आल्याने त्यांची सभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली़उपसभापतीपदासाठी काँग्रेसला लागली लॉटरीउपसभापतीपदासाठी तीच प्रक्रिया राबविण्यात आली.़  भाजपातर्फे लताबाई कोळी, तर काँग्रेसतर्फे उमाकांत रामराव पाटील यांना समसमान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीद्वारे काढण्यात आली़ त्यातही काँग्रेस उमेदवार उमाकांत पाटील यांना संधी मिळाली़  पिठासीन अधिकारी तहसीलदार कुंदन हिरे होते. गटविकास अधिकारी वाय. पी. सपकाळे, नायब तहसीलदार सुनील समदाने यांनी सहकार्य केले. निवडीनंतर सभापती, उपसभापती यांचा गौरव करण्यात आला. काँग्रेसचा जल्लोष  काँग्रेसने दोन्ही जागांवर विजय मिळाल्याने समर्थकांनी जोरदार घोषणा देत जल्लोष केला व विजयी मिरवणूक काढली. त्यानंतर येथील  जिनिंग प्रेसींग सोसायटीच्या सभागृहात विजयी सभा घेतली. प्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, उपस्थित होते.   निरीक्षक बळीराम हिरे व सहका:यांनी चोख बंदोबस्त राखला़ (वार्ताहर)तालुका         सभापती                 उपसभापतीजळगाव    यमुनाबाई रोटे    भाजप    शीतल पाटील    शिवसेनाचोपडा    आत्माराम म्हाळके    भाजप    मच्छिंद्रनाथ पाटील    शिवसेनाअमळनेर    वजाबाई भिल    भाजप     त्रिवेणीबाई पाटील    भाजपपारोळा    सुनंदा पाटील    राष्ट्रवादी    अशोक पाटील    राष्ट्रवादीएरंडोल    रजनी सोनवणे    शिवसेना    विवेक पाटील    शिवसेनाधरणगाव    मंजूषा पवार    शिवसेना    प्रेमराज पाटील     शिवसेनाजामनेर    संगीता पिठोडे     भाजप    गोपाल नाईक    भाजपभुसावळ    सुनील महाजन    भाजप    मनीषा पाटील    भाजपबोदवड    गणेश पाटील    भाजप    दीपाली राणे    भाजपमुक्ताईनगर    शुभांगी भोलाणे    भाजप    प्रल्हाद जंगले    भाजपरावेर     माधुरी नेमाडे     भाजप    अनिता चौधरी    भाजपयावल    संध्या महाजन    काँग्रेस पुरस्कृत    उमाकांत पाटील    काँग्रेसचाळीसगाव    स्मितल बोरसे    भाजप    संजय पाटील    भाजपपाचोरा    सुभाष पाटील    भाजप    अनिता पवार    काँग्रेसभडगाव    हेमलता पाटील    शिवसेना    प्रताप सोनवणे    राष्ट्रवादीभाजपा समर्थ व काँग्रेसमध्ये संघर्ष4यावल येथे काँग्रेसच्या वाहनात संध्या  महाजन आल्या असता सभागृह आवारात वाहनास जाऊ देण्यास  भाजपा समर्थकाकडून मज्जाव करण्यात आला़ या प्रसंगी पोलीस व समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे. आपण भाजपाच्याच सदस्या आहोत़ अपक्ष पल्लवी चौधरी यांची उमेदवारी मला मान्य नसल्याने पं.स.वर भाजपाची सत्ता हस्तगत करण्यासाठी काँग्रेसचे सहकार्य घेण्यात आल़े मी घेतलेल्या निर्णयास ईश्वरानेही साथ दिली़    -संध्या महाजन, नूतन सभापती यावल पं़स़