जळगाव : यावल तालुक्यातील एका महिलेच्या नावाने फेसबुकवर बनावट अकांऊट तयार करुन तिचा व पती संबंधी अश्लिल मजकूर अपलोड करुन पती-पत्नीची बदनामी करणाऱ्या रत्नदीप भिमराव ससाने (रा.जांभुळधाबा, ता.मलकापूर, जि.बुलडाणा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या गावात जावून अटक केली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रत्नदीप याने यावल तालुक्यातील एका महिलेच्या नावाने फेसबुकवर बनावट अकांऊट तयार केले होते. त्यावर तिचा तसेच पतीबाबत अश्लिल मजकूर अपलोड करुन बदनामी केली होती.याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन फैजपुर पोलीस स्टेशनला माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.जागेवरच दाखविला पुरावाउपनिरीक्षक अंगत नेमाने, हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण पटवर्धन, चंद्रकांत पाटील, संदीप साळवे, प्रदीप पाटील, जयंत चौधरी व दर्शन ढाकणे यांच्या पथकाने जांभुळधाबा गाव गाठून रत्नदीप याला ताब्यात घेतले. आपण गुन्हा केला नसल्याचे तो सांगत असताना या पथकाने त्याच्याजवळील मोबाईल ताब्यात घेतला व जागेवरच त्याला पुरावा दाखविला. तेथून सोमवारी दुपारी संशयिताला जळगावला आणण्यात आले. नंतर फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आणखी त्याने काय कारणाने केले आहेत, त्याची माहिती घेण्यात येत आहे.असा लागला आरोपीचा शोधगुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी बनावट अकांऊटची माहिती मिळविण्यासाठी फेसबुकशी पत्रव्यवहार केला होता. फेसबुक कंपनीकडून बनावट अकांऊटचा आयपी अॅड्रेस प्राप्त झाला. नंतर पुन्हा कुराडे यांनी हा आयपी अॅड्रेस सर्व्हीस प्रोव्हायडर कंपन्यांकडे पाठविला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर रत्नदीप भिमराव ससाने याचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना या घटनेची माहिती देऊन त्यांच्या परवानगीने एक पथक बुलडाणा जिल्ह्यात रवाना केले.
बनावट फेसबुक अकांऊटद्वारे यावलच्या महिलेची बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:22 AM
एकास अटक
ठळक मुद्देपती-पत्नीबाबत अश्लिल मजकूर केला अपलोडजागेवरच दाखविला पुरावा