ऑनलाईन लोकमत / जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 9 - नरात्रोत्सवात आदिशक्तिचा जागर आणि तजेलदार ङोंडू फुलांच्या माळा असा उत्साही दरवळ असतो. यंदा मात्र खान्देशावर पावसाची वक्रदृष्टी झाल्याने सर्व प्रकारची फुलं कमालीची महागली आहेत. फुलांचे उत्पादन घटल्याने थेट नाशकातून फुले आयात करावी लागत आहे. सर्व प्रकारच्या फुलांचे दर यंदा दहापट वधारले असून दस:याला ङोंडुच्या फुलांचे दर 200 रुपये प्रतिकिलो होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी बोलून दाखविला. पोळ्याच्या पर्वानंतर सण-उत्सवांची लगबग वाढते. व्रत-वैकल्यांचाही बहर असतो. साहजिकच पूजा-अर्चा,धार्मिक कार्यक्रमांना उधाण येते. पूजेत मानाची जागा घेणा:या फुलांचीही मागणी वाढते. गेल्यावर्षी पावसाने सरासरी ओंल्याडल्याने खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात फुलशेती बहरली होती. याचाच परिणाम गतवर्षी ङोंडूच्या फुलाचे दर 10 रुपये प्रतिकिलो असे खाली कोसळले होते. यावर्षी पावसाने नाशिकला झुकते माप देताना खान्देशात दडी मारली. यामुळे खान्देशातील फुलशेती सुकली असून उत्पादनही मोठय़ा प्रमाणात घटले. विक्रेत्यांना नाशिकच्या बाजारपेठेतून फुले आणावी लागत आहे. गणपती उत्सव, गौरी गणपती, पितृपक्ष, भुलाबाई, नवरात्रोत्सव, विजयादशमी अशा सण-उत्सवाच्या मांदियाळीत फुलांच्या दरवळाने भावभाक्तिही फुलून येतो. यावर्षी फुलांचे भाव गतवर्षाच्या तुलनेत पाच ते दहापट वाढले असून दरवाढीची ही अतिषबाजी दिवाळीतदेखील कायम राहणार आहे.
ङोंडुच्या फुलाचे पाच किलोचे एक कॅरेट 400 ते 600रुपयांपयर्ंत आहे. सद्यस्थिती प्रतिकिलो 150 ते 200 रुपये मोजावे लागतात. नवरात्रोत्सवात हे भाव काहीअंशी वाढणार आहेत. खान्देशात उत्पादन नसल्याने नाशिक येथून फुले आणण्याचा वाहतुक खर्चही होत आहे. गेल्यावार्षी ङोंडुच्या फुलाचे कॅरेट 80 ते 100 रुपयांना विकले गेले. शेवंतीच्या फुलांमध्येही दरवाढ झाली आहे. गेल्यावर्षी 100 रुपये प्रतीकिलो असणारे भाव यंदा 400 रुपयांपयर्ंत उसळी घेत आहे. नाशिकच्या बाजार समितीत फुले खरेदी करणा-या व्यापा-यांची झुबंड उडत असल्याने दरदिवशी दर वाढतात. गुलाबाच्या 100 फुलांसाठी 500 रुपये मोजावे लागतात. गुलाबाच्या फुलाची प्रतीनग विक्री 10 रुपये अशी आहे. गतवर्षाच्या तुलनेत हे दर दुप्पट आहेत. त्यामुळे फुलमाळींमध्ये डोकावणारा गुलाब यंदा विरळ झाला आहे. जरबरा आणि फुलमाळी हे मनोहारी समीकरण. यंदा जरबराही उसळी घेत असून प्रतीनग 40 रुपये असे चढे भाव आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे दर दुप्पट आहेत. लिली दरहजारी 500 रुपयांपयर्ंत भाव खाऊन आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे दर पाच ते सहा पट वाढले आहे. गेलेंडा, तेरडा, निशीगंध, कुंदा या फुलांच्या दरातही तेजी आहे. गेलेंडा 60 तर तेरडा 30 ते 60 रुपये प्रतीकिलो दराने विकला जात आहे. गेल्यावर्षी निशीगंधचे दर 200 रुपये प्रतिकिलो होते. यंदा हे भाव 400ते500 रुपये असे वाढले आहेत. कुंदाची फुलेही भाव खाऊन आहेत. 500ते900 रुपये प्रतिकिलो अशी त्याची विक्री होत असून गेल्यावर्षी 300 ते 400 असे त्याचे भाव होते.
गेल्या काही वर्षात खान्देशात फुलशेतीचे प्रयोग यशस्वी झाल्याने फुलांचे भाव स्वस्त झाले आहे. पाच ते सात वर्षापूर्वी नाशिकच्या फुलांची मक्तेदारी होती. यावर्षी खान्देशात पावसाने पाठ फिरविल्याने नाशिक येथून फुले विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. सर्व प्रकारच्या फुलांचे दर गरवषार्पेक्षा यंदा पाच ते दहापट वाढले आहेत. फुलहारांचे दरही दुप्पट झाले आहे. गेल्या वर्षी नंदुरबार जिल्ह्यातून फुले खरेदी केली होती. नाशिक येथून फुले आणण्याचा वाहतूक भुदर्ंडही लागतो. -वाल्मीक फुलवारी, फुल विक्रेते, चाळीसगाव