जळगाव : जिल्ह्यात कोविडचा धोका पाहता बकरी ईद अत्यंत साधे पणाने साजरी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्या दृष्टीने सर्वांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे योग्य होणार नाही, असे शासनाने कळविले आहे.
कोविड-१९ मुळे संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीदेखील बकरी ईद उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याकरीता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या आहेत.
ईदची नमाज साध्या पद्धतीने घरीच साजरी कावी. सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांनी जनावरे खरेदी करायची असल्यास ऑनलाईन पद्धतीने किंवा दुरध्वनीद्वारे खरेदी करावीत. कुर्बानी शक्यतो प्रतिकात्मक पद्धतीने करावी, लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यात बकरी ईद निमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही.
ईद निमित्त नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, किंवा एकत्र जमु नये. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.