जळगाव : पोळा या सणा पार्वभूमीवर बैल पूजा घरीच करून बैलांची मिरवणूक काढण्यात येवू नये तसेच सार्वजनिक प्रसादाचे वाटप करण्यात येवू नये आणि कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारचे राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाºया सर्व कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच १७ जुलै २०२०च्या शासन परिपत्रकानुसार जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी आॅनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावीत याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राऊत पोळा सणाच्या पार्श्वभूमीवरही गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.
पोळा सणाला यंदा सर्जा-राजाची मिरवणूक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:21 PM