शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

यंदा दोन महिने अगोदरच दहावीचे पुस्तके बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 6:24 PM

चाळीसगावच्या डॉ. पुर्णपात्रेंची सोनाली पुन्हा विद्यार्थ्यांच्या भेटीला. पुस्तकांच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ

ठळक मुद्देपुस्तकांच्या किंमती २० टक्क्यांनी वाढल्याने खिशाचा भार वाढला आहे.गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रत्येक पुस्तकाची किंमत दहा ते वीस रुपयांनी वाढलीदहावीच्या नवीन अभ्यासक्रमात १७ वा धडा म्हणुन 'सोनाली' पुन्हा स्थान

जिजाबराव वाघ/ आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि.५ : दरवर्षी पुस्तकांसाठी प्रतीक्षा ही ठरलेली असते. इयत्ता आठवी पर्यंतची पुस्तके सर्व शिक्षा अभियानातर्गत मोफत मिळत असली तरी दहावीच्या नव्या पुस्तकांसाठी वाट पहावी लागते. यंदा मात्र दोन महिने अगोदरच दहावीची पुस्तके दुकानांवर उपलब्ध झाली आहेत. चाळीसगावचे प्राणीमित्र डॉ.वा.ग.पुर्णपात्रे यांच्या सोनाली पुस्तकातील एक उतारा (धडा) मराठीच्या कुमारभारती पुस्तकात समावेश केला गेला आहे. यावर्षी पुस्तकांच्या किंमती २० टक्क्यांनी वाढल्याने खिशाचा भार वाढला आहे.दहावीची पुस्तके येत्या शैक्षणिक वषार्पासून बदलत आहे. त्यामुळे ती कधी उपलब्ध होतील. याची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांनाही होती. ही नवी पुस्तके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) ३ तारखेपासून उपलब्ध करुन दिल्याने गुरुवारी किरकोळ पुस्तके विक्रेत्यांकडेही आली आहेत.किंमती वाढल्यागेल्या वर्षाच्या तुलनेत प्रत्येक पुस्तकाची किंमत दहा ते वीस रुपयांनी वाढली आहे. सरासरी किंमतीत २० टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेते अनिल मंडलोई यांनी सांगितले. एकुण नऊ पुस्तकांच्या संचासाठी पालकांना ६५० रुपये मोजावे लागणार आहे. सद्यस्थितीत हिंदी व संस्कृत विषयाची वगळता सर्व पुस्तके बाजारात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळी वर्गांना देखील पुस्तके वापरता येतील.'सोनाली' पुन्हा भेटीलाचाळीसगावचे प्राणीमित्र डॉ.वा.ग.पुर्णपात्रे यांच्या १९८८ मध्ये प्रकाशित 'सोनाली' पुस्तकातील एका उता-याचा प्रकरणाचा धडा म्हणून मराठीच्या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वीही इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात तो होता. मात्र १९९२ मध्ये त्याला वगळण्यात आले होते. दहावीच्या नवीन अभ्यासक्रमात १७ वा धडा म्हणुन 'सोनाली' पुन्हा स्थान मिळाले आहे.तीन नातींचा 'संगम'घाट रोड लगत डॉ.पुर्णपात्रे यांचा तितूर नदी किनारी 'संगम' बंगला आहे. येथेच सिंहीण सोनाली, त्यांची कुत्री रुपाली आणि डॉ. पुर्णपात्रेंची नात दिपाली या तिघही नातींचे संगोपन त्यांनी मोठ्या ममत्वाने केले होते. हिस्र प्राण्यांना माणसाळण्याचे अनोखे कसब सोनाली पाठातुन विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे.अभिमान आणि कौतुकहीप्रसंग लहान असले तरी त्यातुन जीवनात खूप काही शिकता येते. सोनाली पुस्तकाची ओळख अशी आहे. दहावीच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश झाल्याने आमच्या परिवारासाठीच नव्हे तर चाळीसगावसाठीही अभिमानाची गोष्ट आहे. सत्यघटना विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे. याचे कौतुकही आहेच.- डॉ. हेमांगी सुभाष पुर्णपात्रेसोनालीकार डॉ.पुर्णपात्रे यांच्या स्नुषा, चाळीसगाव.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव