भुसावळ : २१ जून हा पाचवा योग दिवस जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. योग भारताने जगाला दिलेली निरोगी जगण्याची शक्ती होय. भारतीय योग हे वैज्ञानिक दृष्टीने परिपूर्ण शास्त्र आहेत. हे शास्त्र पाच हजार वर्षांपूर्वी लिहिले गेले होते. तरीही ते शास्त्र असल्याने कुठल्याही काळात नवनवीन वाटणारे ज्ञान आहे, अशी माहिती भुसावळ येथील योग शिक्षक राजीव किसन पाटील यांनी दिली.योग पद्धतीही गुरुशिष्य परंपरेने आलेली एक शास्त्रीय पद्धत आहे. परंतु शास्त्र शिकत असताना शास्त्राचे फायदे ही असतात व तोटेही असतात. योग्य वापर केला की, फायदे होतात व चुकीचा वापर झाला की, नुकसान होते. योग शास्त्र शिकत असताना पाच प्रकारचे यम आणि नियमांचा वापर न करता केलेली साधन ही घातक असते. यम, नियम, आहार, विहार हा योग साधनेचा मूलभूत पाया असून एक अविभाज्य अंग आहे. योग हे वैदिक शास्त्राचे ज्ञान आहे. योगाचे अपूर्ण ज्ञान घातक सिद्ध होते. अपूर्ण ज्ञानाचा प्रचार व प्रसार केल्यास वेददोष लागतात, असेही पाटील यांनी सांगितले.योग शास्त्राचा प्रथम श्लोक अथ योगनु शसन या शब्दाचा अर्थ शिस्तबद्ध असा होतो. शिस्तबद्ध साधनानमुळे मनुष्य शारीरिक व मानसिक निरोगी असणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. आजपासून सर्वांनी योग साधनेस सुरुवात करत मानसिक व शारीरिक निरोगी होऊन यशाचे शिखर गाठून स्वच्छ, सुंदर व निरोगी राष्ट्र घडविण्याचा संकल्प करायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
योग हे परिपूर्ण शास्त्र -राजीव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 2:47 PM