कुºहा (काकोडा), ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील प.पू. गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात योग प्राणायाम म्हणजे दीघार्युष्याची गुरुकिल्ली या उपक्रमांतर्गत योगासन व प्राणायाम शिबिर झाले.या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पतंजली अखिल भारतीय समितीचे महाराष्ट्र राज्याचे महामंत्री योगपंडित शेखरसिंग चव्हाण होते. याप्रसंगी त्यांनी अष्टांग योग याबद्दल माहिती दिली. व्याघ्रासन, हास्यासन, सूर्यनमस्कार यासह कपालभाती, अनुलोम विलोम यांची प्रात्यक्षिक करून दाखविली. तसेच विद्यार्थ्यांकडून ती करून घेतली. गाव गाव जायेंगे सबको योग सिखायेंगे या ब्रिदवाक्याप्रमाणे आम्ही सर्वदूर जावून योग प्राणायाम शिकवत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.आपण आयुष्य कशाप्रकारे आनंदी व सुखकारक जगू शकतो याची माहिती त्यांनी यावेळी उपस्थिताना दिली.महाविद्यालयाचे प्राचार्य वराडे यांनी योग केल्याने होणारे फायदे तसेच विविध रोगांपासून आपली कशी सुरक्षा होते हे सप्रमाण सांगितले. प्रसंगी महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनिंनी या शिबिराचा लाभ घेतला.
कुºहा काकोडा येथे योग प्राणायाम शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 7:33 PM
प.पू. गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात योग प्राणायाम म्हणजे दीघार्युष्याची गुरुकिल्ली या उपक्रमांतर्गत योगासन व प्राणायाम शिबिर झाले.
ठळक मुद्देप्राणायाम म्हणजे दीघार्युष्याची गुरुकिल्लीआनंदी जीवन जगण्यासाठी योग आवश्यक