चाळीसगाव : परिश्रमाशिवाय मिळालेले यश चिरकाल टिकत नाही. ते एखाद्या दगडासारखेच असते. याउलट परिश्रमानंतर मिळालेले यश समाधानाचा सुगंध देऊन जाते. असे उद्बोधन संचालक योगेश अग्रवाल यांनी येथे केले.शनिवारी सायंकाळी अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आ.बं.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक सोहळा झाला. त्यावेळी त्यांनी एक बोधकथा सांगून सतत यशासाठी कार्यमग्न रहा, असा संदेशही दिला.अध्यक्षस्थानी समन्वय समितीचे चेअरमन मु. रा. अमृतकार होते. यावेळी व्ही.एच. पटेल प्राथ. विद्यालयाचे चेअरमन व नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्याहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, रोख रक्कम, स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. प्रास्तविक मुख्याध्यापक साहेबराव मोरे यांनी केले.अध्यक्षीय मनोगतात अमृतकार यांनी एक गरीब मुलगा रोजंदारी करून मोठा उद्योगपती कसा झाला यांचे भावनिक विवेचन दिले. गुणवंत कर्मचा-यांचाही गौरव करण्यात आला. सुलोचना इंगळे, र.सा.मोरे आदी उपस्थित होते. बा. बा. सोनवणे यांनी आभार मानले.
यशाला परिश्रमाचा सुगंध हवाच - योगेश अग्रवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 8:43 PM