शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

चोऱ्या तुम्ही करायच्या अन‌् बिल आमच्या नावाने फाडायचे; गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर टीका

By सुनील पाटील | Published: October 24, 2023 10:03 PM

एल.के.फाऊंडेशनतर्फे मेहरुण तलाव येथे गिरीश महाजन यांच्याहस्ते रात्री आठ वाजता रावणाचे दहन झाले.

जळगाव : आमदार एकनाथ खडसे यांना गौण खनिज चोरी प्रकरणात १३७ कोटी रुपयांचा दंड झाला आहे. या प्रकरणात गुगल मॅपिंग झालेले आहे. एसआयटी स्थापन झालेली आहे. कुठे काहीही झाले तरी त्याची बिलं आमच्या नावाने फाडायची असा हा प्रकार आहे. आम्हाला आता त्यांची किव यायला लागली आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी खडसेंवर केली.एल.के.फाऊंडेशनतर्फे मेहरुण तलाव येथे गिरीश महाजन यांच्याहस्ते रात्री आठ वाजता रावणाचे दहन झाले.

त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांना खडसे व खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. महिनाभर ते दवाखान्यात होते. त्यांनी दीड महिना रुग्णालयात थांबायला सांगितले होते, पण ते अपुरा इलाज सोडून आले. म्हणून ते आजकाल काहीही बडबड करतात. घाणेरडी व असंसदीय भाषा बोलतात. कोणाच्या घरापर्यंत जाणं हे चुकिचे आहे. आता आम्हालाच त्यांची किव यायला लागली आहे.

राऊतांच्या डोक्याचा इलाज करावा लागेलसंजय राऊत यांडोक्याचा इलाज करावा लागेल असे त्यांच्याविषयी सर्वांचे एकमत झाले आहे. सरसंघचालकांनीही आमच्यासोबत यावे असे त्यांना वाटते. हे वेड्या माणसाचेच लक्षण आहे. प्रसिध्दीसाठी ते काहीही बोलतात. राऊंतामुळेच पक्षाला वाईट दिवस आले. ५४ पैकी १० आमदार, चार खासदार राहिलेले नाहीत. कार्यकर्ते राहिलेले नाहीत. यापुढे तर दोनच जण पक्षात राहतील, बाकी सर्व जण सोडून जातील, असे महाजन म्हणाले.

ड्रग्ज प्रकरणात कोणालाच सोडणार नाहीड्रग्ज प्रकरणाचर मास्टरमाईंड ललीत पाटील हा कोणाचा माणूस आहे, कोणत्या पक्षाचा आहे. मातोश्रीवर त्याला कोणी प्रवेश दिला. उगाचच ठाकरे गट दुसऱ्यावर बेछूट आरोप करायला लागले. अमली पदार्थाचा वापर भयंकर, भयावह आहे. तरुणाईला आव्हान तयार झाले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या विषय गंभीर आहेत. कॅबिनेटमध्येही यावर चर्चा झाली. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सरसकट बिमोड केला जाणार आहे. यात कोणीही असो मग तो भाजपचा असो, सामाजिक किंवा कोणत्या पक्षाचा आम्ही त्याला सोडणार नाही, असेही गिरीश महाजन म्हणाले.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजन