कळमसरे, ता. अमळनेर : पदोपदी शासन मदतीवर विसंबून राहण्यापेक्षा स्वत:ची समस्या स्वत:च सोडविली पाहिजे या विचाराने प्रेरीत होवून तालुक्यातील निम गावातील सर्व तरूण एकवटले व गावात अणेर खान संचलीत पाणी फाऊंडेशन ग्रुपची नुकतीच निर्मिती केली.एकाच दिवसात मोठ्या संख्येने तरूणांनी थेट वॉटर कप स्पर्धेत गाव सहभागाचाही संकल्प केला. याला कारणही तसेच ठरले. भारतात आदर्श ठरलेल्या अकरा गावापैंकी एक पाटोदा जि.औरंगाबाद या आदर्श गावाचे तब्बल २५ वषार्पासूनचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान निम जवळील श्री क्षेत्र कपिलेश्वर संस्थानच्या वतीने आयोजित केले होते. याचवेळी पाणी फाऊंडेशनचे प्रेरक अॅड.संभाजी पाटील, अॅड.विवेक पाटील, नंदु पाटील, विनोद चौधरी, मंगेश पाटील यांनीही गावातील पाणी गावातच जिरविण्याची संकल्पना मांडली अन् निम गावाचे ग्रामस्थही पडीत, गावठाण जमिनीवर श्रमदानाने येत्या पावसाळ्याचे पाणी अडवून जिरविण्याच्या तयारीस लागले. निमचे सरपंच भास्कर हिरामण चौधरी, माजी सरपंच मधुकर रामदास चौधरी, डॉ.एल.डी.चौधरी, सरकारी वकील अॅड.राजेंद्र चौधरी, ग्रा.पं.चे विकास अधिकारी पुंडलीक शंकर पाटील, कृषि अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.संस्थानचे सचिव मगन वामन पाटील यांनी सुत्र संचालन केले.पाटोद्याच्या सरपंचांनी दिले प्रोहत्सानऔरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोदा येथील सरपंच पेरे पाटील यांनी त्यांच्या पाटोदा गावात स्वावलंबनाने राबविलेल्या सर्व आदर्श उपक्रमांची माहीती देऊन निम गावाने पुढाकार घेतल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले.
पाण्यासाठी एकवटले निमचे तरुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 5:20 PM