अमळनेर : सततची नापिकी आणि सोयासायटीच्या कर्जाला कंटाळून लोंढवे येथील ३५ वर्षीय तरुण शेतकºयाने जीवन संपविले. ही घटना शनिवारी घडली.श्रीकांत ज्ञानेश्वर बहिरम यांनी अगदोदर फवारणीचे औषध पिऊनही आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र मृत्यू न आल्याने पुन्हा शेतातच गोडाऊनमध्ये गळफास घेत आत्महत्या केली, अशी माहिती नातकेवाईकांनी दिली. अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बहिरम यांच्या पश्चात पत्नी, एक ८ वर्षांचा मुलगा व एक १२ वर्षांची मुलगी असा परिवार आहे.
लोंढवे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 9:41 PM