जळगाव : शेतातील टोमॅटो मालवाहू रिक्षातून कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत असताना रिक्षाच्या टपावर बसलेला महेंद्र निंबा धनगर (वय २० रा.करंज, ता.जळगाव) हा तरुण शेतकरी शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या क्रॉसबारला धडक बसल्याने ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.शिवाजीनगर उड्डाणपुलावर सकाळी ६ वाजता अपघातमहेंद्र धनगर हा तरुण गावात शेती करतो. शुक्रवारी आई व त्याने शेतातून टोमॅटो घरी आणले. ते कठोरा येथील रिक्षा चालक योगराज सपकाळे याच्या मालवाहू रिक्षातून (क्र.एम.एच. १९ एस.९७४२) शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणत असताना सकाळी सहा वाजता हा अपघात झाला. चालकाजवळून उतरुन बसला टपावरकरंज गावापासून तो चालकाच्या शेजारी बसला होता, मात्र आमोदा गावाजवळ तो रिक्षाच्या टपावर बसला. सपकाळे याने रिक्षा शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळील क्रॉसबारच्या खालून काढली, मात्र महेंद्र हा टपावर बसलेला असल्याने त्याच्या डोक्याला क्रॉसबारचा जोरात पाईप लागला, त्यात तो रिक्षाच्या टपावरुन जमिनीवर फेकला गेला. चालकाच्या मात्र हा प्रकार लक्षात आला नाही. पुढे गेल्यावर नागरिकांनी रिक्षा चालकाला थांबविले. महेंद्र फेकला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. नागरिकांनी धावपळ करत त्याला हलविले. महेंद्र याला संदीप हा मोठा भाऊ असून बहिणी कल्पना व मनीषा या विवाहित आहेत. कल्पना मंगरुळ, ता.चोपडा तर मनीषा हिचे पिंप्राळा, जळगाव येथे सासर आहे. आई मालतीबाई या देखील शेतीच करतात. दोन्ही भाऊ अविवाहित आहेत. शेतात भाजीपाल्याचे उत्पन्न घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. अडीच तास मृत्यूशी झुंजमहेंद्र याच्या मेंदूला जबर मार बसला होता. शरीराच्या अन्य कोणत्याही भागाला त्याला इजा झालेली नाही, किंवा रक्ताचा एक थेंबही बाहेर आलेला नव्हता. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर फुपणीचे सरपंच डॉ.कमलाकर पाटील यांनी तातडीने जिल्हा रुग्णालय गाठले. महेंद्रची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांनी त्याला तातडीने अतिदक्षता कक्षात हलविले. तज्ज्ञ डॉक्टरांना यावेळी पाचारण करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना साडे आठ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे...तर महेंद्रचा जीव वाचला असतामहेंद्र हा गावापासून चालकाच्या शेजारी कॅबीनमध्ये बसला होता. त्यानंतर तो आमोदा गावापासून मागे बसला. तो कॅबीनमध्ये थांबला असता तर हा अपघात झाला नसता. महेंद्र हा टपावर बसला असताना मोबाईलमध्ये गुंग होता, क्रॉसबारकडे त्याचे लक्ष नव्हते. लक्ष गेले तेव्हा बचाव करण्याच्याआधीच त्याला पाईप लागला. मोबाईलमध्ये गुंग झाला नसता तर त्याचा जीव वाचला असता.मुलाच्या मृत्यूच्या वृत्ताने वडील सुन्नमुलाचा अपघातात झाल्याचे कळताच वडील निंबा वामन धनगर यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यापाठोपाठ अन्य नातेवाईक दाखल झाले. साडे आठ वाजता महेंद्रची प्राणज्योत मालवली, मात्र बराच वेळ वडिलांना त्याची माहिती देण्यात आली नाही, नंतर मात्र त्यांना सांगण्यात आले. मुलाचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांना जोरदार धक्का बसला. यावेळी ते सुन्न झाले होते.
‘क्रॉसबार’ला धडक बसल्याने तरुण ठार
By admin | Published: March 19, 2017 1:02 AM