शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

शिरसोली येथे सलग तिसऱ्या दिवशी तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 4:16 AM

गळफास : कारण अस्पष्ट जळगाव : तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे समाधान कडू बारी (वय ३४) या तरुणाने राहत्या ...

गळफास : कारण अस्पष्ट

जळगाव : तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे समाधान कडू बारी (वय ३४) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, गेल्या तीन दिवसातील सलग तिसरी घटना आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, समाधान कडू बारी हा तरुण पत्नी दीपाली व मुलगा दुर्गेशसह वास्तव्याला होता. शेतीचे व मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. गावात त्याचे दुसरे घर आहे. त्याच ठिकाणी रात्री झोपायला जायचा. बुधवारी सकाळी तो घरी येऊन आंघोळ करून पुन्हा दुसऱ्या घरी गेला. बराच वेळ झाल्यानंतर घरी न आल्याने कुटुंबातील सदस्य सकाळी सात वाजता दुसऱ्या घरी गेले असता समाधान याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मृतदेह तातडीने खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. समाधान याच्या पश्चात आई अंजनाबाई बारी, पत्नी दीपाली, सहा वर्षांचा मुलगा दुर्गेश, लहान भाऊ असा परिवार आहे. या घटनेची एमआयडीसी पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.