पारोळा : आंबापिंप्री येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणास कंटाळुन विषप्राशन करून गुरुवारी आत्महत्या केली.प्रवीण शालिक माळी (वय ३५) यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटी व हातउसनवारीचे कर्ज होते. तसेच सततच्या नापिकीमुळे ते हताश झाले होते. या विवंचनेत त्यांनी २६ रोजी सायंकाळी ५ ते साडेसहा वाजेच्या कपाशीवर फवारणीचे विषारी औषध सेवन केले. त्याचा परिणाम लक्षात येताच त्यांना उपचारासाठी कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.याबाबत पारोळा पोलिसात शालिक माळी यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास काशिनाथ पाटील करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी व मुलगी आहे.
विहिरीत तोल गेल्याने युवकाचा मृत्यूपारोळा : टिटवी येथील १९ वर्षीय युवकाचा शेतातील विहिरीवर हात-पाय धुण्यासाठी गेला असता तोल गेल्याने विहिरीत पडून मत्यू झाला. ही घटना २६ रोजी सायंकाळी घडली.राजेंद्र धनराज सोनवणे (१९) हा शेतात काम झाल्यानंतर विहिरीवर हात-पाय धुण्यासाठी गेला असता पाय घसरून विहिरीत तोल गेला. ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले. पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवलदार कैलास शिंदे तपास करीत आहेत.