शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

आपलं घर हातभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:48 AM

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात माया धुप्पड यांचा लेख.

‘आपलं घर हातभर’ असं जे म्हटलं जातं ते अगदी खरं तर आहेच पण खूप सुंदरही आहे. हे शब्द तनामनाला विसावा देतात, हातभर शब्दापासून आभाळभर अर्थ व्यक्त करतात. हे शब्द म्हणजे प्रत्येकाच्या मनातील ‘आपल्या घरात आपण राजे’ हा भाव व्यक्त करणारी एक भाववृत्ती आहे. काही कारणाने आपण नातेवाईकांकडे जातो. तेव्हा पहिल्या दिवशी पाहुणा, दुस:या दिवशी पै आणि तिस:या दिवशी त्याची अक्कलच काढली जाते, ही प्रचिती सर्वानाच येते. ते साहजिकच आहे. त्याचं वाईट वाटण्याचंही कारण नसतं. याच्याही पलीकडे जाऊन ब:याच ठिकाणी छान आदर सत्कार होतात. दोन-चार दिवस आणखी राहण्याचा आग्रहसुद्धा होतो. पण ते शब्द आणि त्या कृती अर्थातच विशिष्ट मर्यादेच्या वतरुळात फिरत असतात. म्हणूनच आपण त्या पाहुणचाराच्या, त्या घराच्या वतरुळातून बाहेर पडतो. आपल्या घरी आल्यावर मात्र परीघ नसलेल्या वतरुळात आल्यासारखं वाटतं. वागण्या-बोलण्याच्या वतरुळाचा परीघ विस्तारत जातो. तिथे आपली सत्ता असते. आपलं घर राजमहाल नसलं तरी आपण मात्र आपल्या घरात ‘राजे’ असतो. महालाला ‘महाल’ म्हटलं जातं, ‘घर’ नाही. ‘घर’, किती सुरेख शब्द! दोन अक्षरी. ना काना, ना मात्रा, ना उकार, ना वेलांटी, म्हणजेच द्वेष, मत्सर, अपमान, कमीपणा काहीच नाही. ‘घर’ या दोन अक्षरांच्या वर, खाली, आजू-बाजूला अनेक भावभावनांचे सुंदर गोफ विणलेले असतात. युगायुगाची हवीशी वाटणारी बंधनं, प्रेम, आपलेपण, स्नेह, माया, लळा, जिव्हाळा यांचे गोफ या शब्दाभोवती विणलेले असतात. परस्परांच्या सुखदु:खात एकरूप होण्याची एक दिव्य शक्ती ‘घर’ या संकल्पनेने मनात रुजते आणि फुलते. घरी वाट पाहणारं कुणीतरी असतं म्हणून घराची वाट धरण्याची ओढ असते. दिवसभर काम करणारा नोकरदार असो, कामगार असो, कुणी मोठा ऑफिसर, उद्योजक वा व्यापारी असो, प्रत्येकालाच संध्याकाळपासूनच घरी जाण्याचे वेध लागलेले असतात. संध्याकाळच्या 70 टक्के गर्दीचे पाय घरच्या दिशेने धावणारे असतात. शाळेतल्या मुलांची तर फारच मजा येते. शाळा सुटली की ‘हो..’ अशा सामूहिक आनंदस्वरांच्या लहरी घराकडे धावू लागतात. घराचं हे साधंसुधं पण मनोहर स्वप्न सगळ्यांचंच असतं. हे ‘घरटं’ म्हणजे साधी ‘झोपडी’सुद्धा चालते. कारण, राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली। ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माङया।। अगदी साधी, शेणाने सारवलेली झोपडीसुद्धा समाधानाचं माप, पदरात भरभरून टाकते. तिथे साध्या भाजी-भाकरीत अमृताची गोडी असते. कांदा, मुळा, भाजी ‘विठाई’ होऊन येतात. शेणसडा घातलेल्या अंगणातली रांगोळी तुळशीबरोबर गुजगोष्ष्टी करीत असते. तोरण वा:यासवे हलून ‘हुंकारा’ देत असते. घरातली कमीच पण ‘लखलख’ भांडी, घराचं स्वच्छ चित्र दाखवतात. अंगणात नातवांसह आजोबा-आजींची मैफील जमलेली असते. सासुरवाशीण काम करताना मधूनच अंगणातल्या सदाफुली, जास्वंदीशी गप्पा मारीत असते. ही फुलं तिला प्रतिकूल परिस्थितीतली वाट आनंदाने चालायला शिकवतात. ग्रामीण भागात तर हे चित्र दिसतंच. मी जेव्हा जेव्हा अशा ठिकाणी जाते किंवा प्रवासातही काही वेळा अशा झोपडय़ा दिसतात. तेव्हा मी ही ‘घरे’ मनाच्या चंदनी पेटीत साठवत राहते. ब:याचदा आपण पाहतो, काही इमारती खूप जुन्या झालेल्या असतात. तिथल्या घरांमधील लोक कसेबसे, जीव मुठीत धरून राहात असतात. इमारत मोडकळीस आलेली असते. पण त्या घरातल्या लोकांची ‘जिद्द’ ताठ उभी असते. कशाबशा उभ्या असणा:या त्या घरांच्या आजुबाजूला, लहानशा जागेत, जीव मुठीत धरून बसलेल्या कुंडय़ांमधून गुलाब, मोगरा, शेवंती इ.फुले तुळशीसोबत हसत असतात. जीवन आनंदाने जगण्याची प्रेरणा देत असतात. ते पाहून मला आठवतं एक शक्य, ‘घोसले में रहकर आसमान में उडने का एहसास कैसे होता है, यह एक चिडियांसे पुछो’, आणि मग त्या घरांमध्ये राहणारे लोक मला चिमण्यांसारखे वाटू लागतात. आपलं घर सर्वानाच सुरक्षित वाटतं. आपल्या घरात येऊन आपल्यालाच कुणी बोलू शकत नाही, रागवू शकत नाही. घरात आई असते. आई हेच त्यांचं घर असतं. लहान मुलांसाठी जसा आईचा पदर असतो, तसाच घराचा पदर घरातल्या सर्वासाठी असतो. नोकरीनिमित्ताने बालपणंच घर सोडून शहरात गेलेल्यांनाही बालपणंच घर कायम खुणावत असतं. लेखक- कवींचं मन तर तिथे गुंतलेलंच असतं. कवी अनिल भारतींची ही कविता आपल्या आठवणीतल्या घराला साद घालते. खरंच, असं असतं ‘घर’ जे आपल्या मनात कायमचं ‘घर’ करून बसलेलं असतं, बसलेलं असतं..