जळगाव : पती पत्नीच्या वादातून नैराश्यात आलेल्यारवी अंकुश गरुड (२६) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता शिवाजी नगरातील रोहनवाडीत घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी हा पत्नी व दोन मुलांसह उधना (सुरत) येथे राहत होता. पिण्याच्या पाण्याचे जार वितरण करण्याच्या गाडीवर तो कामाला होता. पत्नीशी नेहमीच वाद होत असल्याने आठ महिन्यापासून येथील रोहणवाडीत राहत असलेल्या आई व भावाकडे आला होता. कुटुंब घरात असताना रवी हा वरच्या मजल्यावर गेला आणि ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील लहान मुलगा त्याला बोलवायला गेला असता त्याने प्रतिसाद दिला नाही. आत कुलर सुरु असल्याने झोपला असावा म्हणून हा मुलगा परत आला. नंतर परत थोड्यावेळाने गेला असता दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने फटीतून डोकावून पाहिले असता रवीने गळफास घेतल्याचे दिसून आले. कुटुंबाने शेजारच्यांच्या मदतीने त्याला जिल्हा रूग्णालयात आणले असतावैद्यकीय अधिकाºयांनी मृत घोषीत केले. रवीच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.
जळगावात कौटुंबिक वादातून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 7:49 PM
पती पत्नीच्या वादातून नैराश्यात आलेल्यारवी अंकुश गरुड (२६) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता शिवाजी नगरातील रोहनवाडीत घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ठळक मुद्देपत्नीशी होते वाद आठ महिन्यापासून आईकडे वास्तव्य