हिंगोणे, ता. यावल : येथील रहिवासी धीरज धनसिंग पाटील (४०) यांनी दिनांक १४ रोजी दुपारी गळफास घेतल्याने गावात एकच खळबळ उडाली. याबाबत सविस्तर वृत्त असे की , धीरज धनसिंग पाटील हे एका हाताने व पायाने अपंग होते तरीही त्यांची जिद्द व चिकाटी असल्याने त्यांनी लग्नसमारंभात लागणारे साहित्य व मंडपचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय करून आपल्या परीवाराचे पालन पोषण ते करत होते. सदर सामान ठेवण्यासाठी त्यांनी गावातीलच रहिवासी दशरथ पाटील यांचे घर भाड्याने घेतले होते .व त्या ठिकाणी मजुर हे दुपारी साडेतीनच्या सुमारास मंडपचे सामान घेण्यासाठी गेले असता त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत धीरज पाटील दिसून आले. हे दृश्य पाहून त्यांनी लागलीच येथील पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांना माहिती दिली. या माहितीवरून फैजपुर पोलीस स्टेशनचे पोनि प्रकाश वानखेडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ हिंगोणा येथे पाठवून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व पोलीस हे . काॅ. देविदास सुरदास, चेतन महाजन यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह यावल रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी हलिवला. मृत्यूचे कारण अद्यापही कळू शकले नाही. मयत धीरज पाटील यांच्या पश्चात पत्नी व चार वर्षाची एक मुलगी असा परिवार आहे.
हिंगोणे येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 7:31 PM