लोकमत न्युज नेटवर्क
जामनेर : फत्तेपूर येथून येत असताना वाकडी जवळ महिलेस दुचाकीची धडक लागल्याने दुचाकीस्वार तरुण व महिला जखमी झाली होती. उपचार घेतांना दुचाकीस्वार ज्ञानेश्वर प्रताप तंवर (३०, रा.डोहरी तांडा, ता.जामनेर) यांचा गोदावरी रुग्णालयात मृत्यू झाला.
याबाबत पहूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, तंवर यांचा मृत्यू ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याचे राष्ट्रवादी व्हीजेएनटी सेलच्या जिल्हाध्यक्षा डॉ. ऐश्वरी राठोड यांनी केला आहे. त्यांनी सोमवारी डोहरी तांडा येथील मयताच्या कुटुंबीयांची भेट घेत माहिती घेतली. पहूर पोलिसांशी त्यांनी संपर्क साधून चौकशीची मागणी केली. सखोल चौकशीचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोहरी तांडा येथील रहिवासी ज्ञानेश्वर प्रताप तवर हा दुचाकीने वाकडीकडे जात असताना गावाजवळील रस्त्याच्या डाव्या बाजूने एका महिलेस धडक दिली. यात महिला व दुचाकीस्वार जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना दवाखान्यात हलविले. ज्ञानेश्वर याला गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ. गायसमुद्र यांनी डोक्याला व छातीला जबर मारहाण झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात म्हटले आहे. त्यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल सुरवाडे तपास करीत आहेत. साक्षीदार फकिरा मोईद्दीन खाटीक यांचा जवाब पोलिसांनी नोंदविला आहे.
फोटो कॅप्शन
डोहरी तांडा (ता. जामनेर) येथील मयत तंवर यांच्या कुटुंबीयांसोबत डॉ. ऐश्वरी राठोड.