जळगाव : मुंबई येथे बहिणीच्या लगAाची बोलणी करुन घरी परत येत असताना कार पुलावरुन कोसळल्याने झालेल्या अपघातात केतन हिरामण काळे (वय 28 रा.विठ्ठल पेठ, बुनकरवाडा, जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला तर त्याचा काका सोपान आनंदा काळे हे गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास ठाणे व डोंबिवलीच्या दरम्यान हा अपघात झाला.जुन्या जळगाव परिसरात राहणारा केतन याचा वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे तर वडील व काका हे शेती करतात. लहान बहिण नैना हिच्या लगAाचे स्थळ मुंबईत निश्चित झाले होते. त्याबाबत केतन व काका सोपान काळे हे बोलणी करण्यासाठी शनिवारी एका कारने मुंबईत गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर रविवारी रात्रीच ते निघाले. ठाणे ते डोंबिवली या दरम्यान महामार्गावर उड्डानपुलाजवळ रात्री समोरुन येणा:या वाहनाच्या लाईटचा प्रकाश डोळ्यावर आल्याने कारवरील नियंत्रण सुटल्याने ती पुलाच्या खाली कोसळली. यात केतन जागीच गतप्राण झाला तर काका सोपान काळे गंभीर झाले. त्यांच्यावर मुंबईतील दवाखान्यात उपचार सुरु आहेत.जळगावात झाले अंत्यसंस्कारअपघातात ठार झाल्यानंतर शवविच्छेदन व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करुन केतनचा मृतदेह संध्याकाळी जळगावात आणण्यात आला. सात वाजता त्याच्यावर शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. केतन याचा स्वभाव प्रेमळ व मनमिळावू असल्याने अंत्यसंस्काराच्यावेळी अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.दोन बहिणींचा एकुलता एक भाऊकेतन हा दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. मोठी बहिण गितांजली ही विवाहित आहे तर लहान नैना हिच्या लगAाची यंदा तयारी सुरु होती.वडील हिरामन आनंदा काळे हे शेती करतात. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिणी, मेहुणा, काका व आजोबा असा परिवार आहे. केतन हा अविवाहित होता. केतन हा मनमिळावू स्वभावासाठी परिसरात परिचित होता. परिसरातील चांगल्या कामांमध्ये तो सक्रिय सहभाग घ्यायचा. काका सोपान काळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्याच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले.
विठ्ठलपेठेतील तरुण ठार
By admin | Published: January 10, 2017 12:06 AM