दहिगाव/यावल : सावखेडा येथील खाटीक कुटुंबातील २३ वर्षीय तरुण वड्री धरणात बुडाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. तरुणाचा मृतदेह काढण्याचे काम सुरू होते.सूत्रांनुसार, फिरोज वसीम खाटीक (वय २३) व त्याचा मोठा भाऊ मोहसीन खाटीक हे दोन्ही रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वड्री धरणावर पोहोण्यासाठी गेलेले होते. ते धरणात बुडत असताना यातील मोठ्या भावाला मोहसीन याला परसाडे येथील तरुणांनी वाचविले. यात ते यशस्वी झाले, तर लहान भाऊ फिरोज वसीम खाटीक याचा हात सुटल्याने तो पाण्यात बुडाला.घटनेचे वृत्त कळताच सावखेडा येथील पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, अतुल भालेराव, पोलीस पाटील बशीर तडवी, यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे घटनास्थळी पोहोचले व घटनेची पाहणी केली.बेपत्ता युवक यावल येथील कला, वाणिज्य महाविद्यालयातील टी.वाय.बी.ए.च्या वर्गात शिकत होता.
सावखेडा येथील तरुण वड्री धरणात बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 9:25 PM
सावखेडा येथील खाटीक कुटुंबातील २३ वर्षीय तरुण वड्री धरणात बुडाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
ठळक मुद्देमोठा भाऊ सुदैवाने वाचविलामृतदेह शोधण्याचे काम सुरू