साकळी, ता.यावल, जि.जळगाव : आजारास कंटाळून येथील राजू लोटू ठोसरे या ४५ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना २० रोेजी रात्री घडली.पोलीस सूत्रांनुसार, साकळी, ता.यावल येथील चांभार वाडा भागातील रहिवाशी असलेल्या राजू लोटू ठोसरे याने २० रोजी रात्री बºहाणपूर- अंकलेश्वर महामार्गावरील महाजन यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती गावात समजताच अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.राजू ठोसरे हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता व मानसिकदृष्ट्या तणावातही होता व त्याला कमी दिसत होते. दरम्यान, त्याने याआधी दिवसभर आपल्या राहत्या घरात गळफास लावण्याचा तसेच इलेक्ट्रिक स्विचमध्ये हात घालून विजेचा शॉक लावून घेत आत्महत्या करण्याचा दोन-तीनदा प्रयत्न केला. तथापि, त्याला शेजारी-पाजाऱ्यांनी आवरले होते, असे त्याच्या राहत्या ठिकाणच्या रहिवाशांकडून समजले आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन मुके भाऊ, दोन बहिणी, विधवा वहिणी, दोन पुतणे असा परिवार आहे.शवविच्छेदन यावल येथील ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास हवलदार युनुस तडवी व सहकारी करित आहे.
यावल तालुक्यातील साकळी येथे तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 2:44 PM
आजारास कंटाळून साकळी येथील राजू लोटू ठोसरे या ४५ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
ठळक मुद्देआजारास कंटाळून घेतली विहिरीत उडीयाआधीही त्याने दिवसभर केला होता आत्महत्येचा प्रयत्नशेजारच्यांनी आवरले होतेमात्र मध्यरात्रीनंतर संपविले स्वत:लाअनेकांची घटनास्थळी धाव