ऑनलाईन लोकमतजळगाव, दि़ 24 - खाकी वर्दीचे स्वपA उराशी बाळगून पोलीस भरतीच्या तयारीसाठी महामार्गावर धावणा:या नशिराबाद येथील दीपक गौतम सावळे (वय- 23) या तरुणाला ट्रकने चिरडल्याची घटना रविवारी सकाळी 6़30 वाजेच्या सुमारास नशिराबादजवळ राष्ट्रीय महामार्गावर त्रिमूर्ती मुंजोबाच्या मंदिराजवळ घडली़ घटनेनंतर ट्रक सोडून चालक पसार झाला़ नशिराबाद पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आह़ेदीपक सावळे हा नशिराबाद येथील मुक्तेश्वर नगरात परिवारासह राहतो़ मलकापूर येथील महाविद्यालयात बाहेरुन डी फार्मसीचे शिक्षण घेत आह़े 12 वी पास झाल्यापासून त्याचे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न होत़े शारिरीक चाचणीच्या दृष्टीने दीपक हा त्याच्या मित्रासोबत पहाटे 5 वाजेच्या महामार्गावर धावत अस़े नेहमीप्रमाणे रविवारी दीपक हा त्याच्या मित्रासोबत महामार्गावर धावण्यासाठी गेला होता़ महामार्गाला रस्त्याच्या एका बाजूने नशिराबादकडे धावत परतत असताना भुसावळहून जळगावकडे येत असलेल्या ट्रकने (क्र ़सी़जी़ 04़डी़ए़5636) ने मागून जोरदार धडक दिली़ त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला़ दीपकच्या पश्चात्त आई, वडील, भाऊ अजरून व ललीता व शिला या दोन बहिणी असा परिवार आह़े ललीता विवाहीत असून पुण्याला नांदते तर अजरून व शीला शिक्षण घेत आह़े
चालक ट्रक सोडून घटनास्थळाहून पसारअपघाताची माहिती मिळताच नशिराबाद ग्रामपंचायत सदस्य विनोद रंधे, ग्रामस्थ विनोद रंधे, शुभम सपकाळे, पप्पू गालफाडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली़ रिक्षातून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला़ जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील यांनी रुग्णालयात जावून नातेवाईकांची भेट घेतली़ व शवविच्छेदनानंतर मृतदेह नशिराबादला हलविला़घटनास्थळावरुन चालक ट्रक सोडून पसार झाला होता़ माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षकअशोक खरात, सहाय्यक पोलीस निरिक्षक आऱटी़धारबळे, निळकंठ महाजन, शांताराम तळेले, शाम काळे, राजेंद्र साळूंखे यांनी घटनास्थळ गाठल़े व ट्रक ताब्यात घेतला़ याप्रकरणी विनोद भगवान रंधे यांच्या फिर्यादीवरुन नशिराबाद पोलिसात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आह़े सपोनी आऱटी़धारबळे तपास करीत आहेत़
भरतीपूर्वीच दीपकवर काळाची झडप27 डिसेंबरला मुंबई येथे पोलीस भरती मंगळवारी दीपक मुंबईला जाणार होता़ या भरतीसाठी महिनाभरापासून त्याची शारिरीक चाचणीसाठी जोरदार तयारी सुरु होती़ लेखी परीक्षेच्या अभ्यासाठी त्याने चार महिन्यांपूर्वी महिन्यात स्वातंत्र्य चौकातील नवभारत अॅकडमी येथे क्लास लावला होता़ तीन दिवसांवर भरती असल्याने शारिरीक चाचणीच्या दृष्टीने धावणे यासह इतर गोष्टींचा त्याचा कसून सराव सुरु होता़ यासाठी तो दोन ते तीन दिवसांपासून क्लासलाही आला नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालयात दीपकच्या मित्रांनी दिली़
कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोशशांत व मनमिळावू स्वभाव तसेच मेहनती मुलगा म्हणून दिपक गावात सर्वाना परिचित होता़ अपघाताची माहिती मिळताच त्याच्या मित्रपरिवारासह नागरिकांनी दीपकच्या घरी गर्दी केली़ व कुटुंबियांचे सात्वन केल़े आई,वडीलांसह बहिणीचा आक्रोश बघून उपस्थित सर्वाचेच डोळे पाणावले होत़े पुणे येथील बहिणी पोहचल्यावर सायंकाळी शोकाकूल वातावरणात दीपकवर अत्यंसंस्कार करण्यात आल़े घटनेमुळे मुक्तेश्वरसह नशिराबाद सुन्न झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आह़े