जळगाव : घरासमोरील लोखंडी सळई चोरी केल्याच्या संशयावरून पोलिसात तक्रार दिल्याने राग आल्याने ईश्वर सीताराम पाटील (वय ४०, रा. इच्छादेवी मंदीर) यांना शनिवारी रात्री दगडाने मारहाण झाली. याप्रकरणी रविवारी गणेश गोविंद मिस्तरी व ललित मिस्तरी या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईश्वर सीताराम पाटील हे रिक्षा चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. घराचे किरकोळ बांधकाम करण्यासाठी लोखंडी आसारी खरेदी करून अंगणासमोर ठेवली आहे. दरम्यान १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता आसारी चोरी झाल्याचे लक्षात आले. गल्लीत राहणारे गणेश गोविंद मिस्तरी व ललित मिस्तरी यांच्यावर संशय व्यक्त केला. याप्रकरणी पाटील यांनी पोलिसात तक्रारही केली होती. याचा राग आल्याने गणेश आणि ललित यांनी इच्छादेवी चौकासमोर ईश्वर पाटील यांच्या डोक्यात दगड टाकून दुखापत केली. तपास नितीन पाटील करीत आहे.