वरणगाव : प्रेम विरह असह्य झाल्याने प्रवीण बाळू कोळी (वय 23] पिंपळगाव खुर्द, ता. भुसावळ) या तरुणाने रविवारी आत्महत्या केल्याची घटना घडली.प्रवीणचे दुरच्या नात्यातील मुलीशी प्रेमसंबंध होत़े परंतु परिवारातील लोकांचा या संबंधास विरोध होता. आपले लगA मनपसंद वरासमवेत घडू शकत नसल्याच्या भावनेतून तरुणीने दीड महिन्यापूर्वीच मुंबई येथे आत्महत्या केली. प्रेयसीने जीवनयात्रा संपविल्याने प्रवीण कोळी यांना नैराश्य आले होत़े अखेर प्रेम विरहातून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आह़े प्रवीण कोळी याचे लगA जुळत नसल्याने रविवारी दुपारी घराच्या छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आह़े तपास पो.हे.काँ.राजेंद्र नारेकर करीत आहेत.(वार्ताहर)
प्रेम विरहातून तरुणाची आत्महत्या
By admin | Published: March 26, 2017 11:47 PM