हितेंद्र काळुंखेजळगाव: वेगवेगळ्या विषयांवरुन जिल्हा परिषद नेहमीच गाजत आहे. गाजण्याचे दोन प्रकार असतात.. एक सुप्रकारे व दुसरा कुप्रकारे. यातील पहिला प्रकार जिल्हा परिषदेच्या वाटेला जवळपास नाहीच. नेहमीच कुप्रकारांनी जिल्हा परिषद गाजत असून जिल्हा परिषचे आरोग्यच यामुळे बिघडल्यासारखे झाले आहे.गेल्जा अनेक वर्षात अनेक घोटाळे व अधिकाऱ्यांबाबत तक्रारी, पदाधिकाºयांमधील भांडणे यामुळे विकासकामांवर दुष्परिणाम हा झालाच आहे. यात असा एक विभाग नाही की तो सुटला. परंतु मुलांचे भविष्य घडविणारा शिक्षण विभाग तर अग्रेसर आहे ,असे म्हटले तरी चालेल. गणवेश घोटाळा, बेंच प्रकरण, अपंग युनीट, शिक्षक बदल्या यासह अलीकडील शिक्षक समायोजन आदी अनेक प्रकरणांमुळे शिक्षण विभागाची प्रतिमा तर खूपच मलीन झाली आहे. ज्या विभागात एवढी अनागोंदी आहे, त्या खात्याचा कारभार कसा चालत असेल? हा प्रश्नच आहे. सध्याचे सभापती पोपट भोळे यांनी तर अधिकारी ऐकतच नाही, अशी ओरड करुनही काहीच उपयोग झाला नाही. मुख्याध्यापकांचे शिक्षकच ऐकत नाही, जणू असाच हा प्रकार म्हणावा लागेल.कामे वेळेत न झाल्याने आता सुरु धावपळएकीकडे घोटाळे आणि तक्रारींचा अडसर असताना दुसरीकडे दप्तर दिरंगाईचा फटकाही बसत आहे. जिल्हा परिषदेचा कोट्यवधीचा निधी डिसेंबर अखेरपर्यंतही खर्च झाला नव्हता यामुळे जिल्हा नियोजनचा मागील वर्षांमधील १४ कोटीचा निधी तर परत पाठवावा लागला व इतर निधी मार्चच्या आत खर्च न झाल्यास पुढे आचारसंहिताही लागणार असल्याने हा निधी खर्च करण्यासाठी एकच धावपळ सुरु झाली आहे, आधीच ही धावपळ आणि तत्परता दाखवली असती तर काय बिघडले असते. गेल्या १५ दिवसात शेकडो कामांना मंजुरी मिळाली आहे. हीच मंजुरी वर्षभरात का मिळू शकली नाही ? हा देखली महत्वाचा प्रश्न आहे. या दिरंगाईस जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.जनतेच्या आरोग्याकडेही दुर्लक्षमुळातच जिल्हा परिषदेचे आरोग्य हे विविध कारणांनी बिघडले असताना जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागही यापेक्षा वेगळा नाही. सर्वत्र मौखिक कर्करोग दिन साजरा होत असताना या विभागाने मात्र या दिनाकडे अजिबात लक्ष दिले नाही. कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन केले गेले नाही. वास्तविक आरोग्य विषयक दिन साजरा करण्याची व त्यानिमित्त नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन व विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम या विभागाचे असताना या दिनाचे औचित्य न पाळता त्याकडे दुर्लक्ष करणे हे गंभीरच आहे. असे असताना मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने हा दिवस साजरा झाला नाही, असे कारण जिल्हा आरोग्य आधिकारी यांनी पुढे करुन सारवासरव करण्याचा प्रयत्न करणे हे त्याही पेक्षा चुकीचे आहे. कारण अधिकारी नाही म्हणून असे कार्यक्रम घेवू नये, असा नियम नाही. आरोग्य ही अशी बाब आहे, की वेळेवरच इलाज होणे गरजेचे असते. नाही तर आजार हा वाढतच जातो. यासाठी डॉक्टर (डॉक्टरेट) असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील यांनी एकूच जिल्हा परिषदेच्या बिघडलेल्या आरोग्यावर जालीम इलाज करणे गरजेचे आहे.
जिल्हा परिषदेचे ‘आरोग्य’ बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:29 PM