जळगाव : जिल्हा परिषदेत निधीच्या मुद्यावरून उठलेल्या वादळाने सोमवारी अधिक गती पकडली़ भाजपच्या काही सदस्यांनी या नाराज सदस्यांना पाठिंबा दिला़ या नाराज सर्व पक्षीय सदस्यांनी सोमवारी सर्व विभाग पिंजून काढत कामांची माहिती काढली व अखेर साडे चौदा कोंटीच्या कामांच्या फायली आहे त्या ठिकाणी थांबविण्याचे आदेश सीईओ व एसीईओंनी दिले़ या प्रकारामागे कोणी एक मास्टर मार्इंड असून आता त्याचा शोध घेऊन मोठा घोळ बाहेर येण्याचे संकेत या सदस्यांनी दिले आहेत़जिल्हा नियोजनकडील तीस टक्के निधीसाठी कामांच्या शिफारसी करून त्यांच्या प्रमा नियोजनकडे पाठविल्यानंतर निधी येणार होता़ त्यापैकी साडे चौदा कोटी रूपयांच्या कामांच्या परस्पर, बनावट शिफारश करून अध्यक्ष, उपाध्यक्ष, तीन गटनेते, चार सभापती व काही सदस्य आपल्याला अंधारात ठेवत परपस्पर कामे टाकून घेतली, असा आरोप करीत सोमवारी लालचंद पाटील, गजेंद्र सोनवणे, रवींद्र पाटील, मीना पाटील, पल्लवी सावकारे यांनी अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या व माहिती गोळी केला़सर्व सदस्यांना समान न्याय मिळत असेल तरच आम्हाला मान्य आहे, अन्यथा आमच्या नाववर जो शुल्लक निधी आहे तो आम्ही नाकारत असल्याचे सदस्या पल्लवी सावकारे यांनी सांगितले़अशी आहेत कामेग्रामपंचायत ४़५० कोटी, शिक्षण ४़५० कोटी, महिला व बालविकास ४़५० कोटी, आरोग्य १़५० कोटी अशा निधीची कामे परस्पर टाकण्यात आली होती़यात काहींच्या वर्कआॅर्डर, काहींच्या प्रमा, तर काहींच्या शिफारशी बाकी अशा अवस्थेत ही कामे एसीईओंकेडे आहेत़ ही कामे नियोजनकडे पाठविल्यानंतर हा निधी मिळाला असता़ मात्र, आता या कामांना बे्रक देण्यात आल्याची माहिती या सदस्यांनी सोमवारी सायंकाळी दिली़सस्पेन्स केळीच्या लोगोचेशासकीय शिफारशी या शासकीय लेटरहेड ज्यावर केळीचे झाड असलेला जिल्हा परिषदेचा लोगो असतो अशा पेपरवरच दिल्या जातात़ तशाच सर्व पेपवर एसीईओंची सही आहे, मग आता ज्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत, त्यावर कुठेही हा लोगो नाही, शिवाय फॉरमॅटही बदलला आहे़ त्यामुळे यात बाहेरी व्यक्तिचा हात असून या शिफारशी बाहेर टाईप करण्यात आल्याचा गंभीर आरोप या सदस्यांनी केला आहे़ याबाबत चौकशीसाठी मंगळवारी सीईओंना निवेदन देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे़सहा कोटींचे गौडबंगाल काय ?अर्थसंकल्पात खर्चांमध्ये दोन कोटींची तरतूद होती ते खर्च झाले़ मग कुठली तरतूद नसताना बांधकाम सेसचे सहा कोटी आले कुठून? असा सवाल उपस्थित करून या सदस्यांनी सहा कोटींच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे़
दिवसभर जि़प़ पालथी घालत १४ कोटींच्या कामांना मिळविला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 9:20 PM