ठळक मुद्देकेवळ नामधारी 50 टक्के उपस्थितीकोरोनानंतर शिक्षणाचा बोजवारा
अमळनेर : शासनाने नुकतेच परिपत्रक काढून शाळेत दररोज शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती असणे बंधनकारक केले आहे. मात्र तरीही शाळेत शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती नसल्याची स्थिती उघडकीस आले आहे. केवळ ५० टक्के उपस्थितीच काय पण १०० टक्के अनुपस्थिती शाळांमध्ये प्रत्यक्ष भेट दिली असता दिसली.यात काही ठिकाणी होतकरू शिक्षकांची मात्र ५० टक्के उपस्थिती दिसली. नोव्हेंबर महिन्यात नुकतेच शासनाने एक परिपत्रक निर्गमित करून शाळेत दररोज शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती असणे बंधनकारक केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अनेक शिक्षकांच्या सेवा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोरोना साथरोग उपाययोजना कार्यक्रमाकरिता संलग्न करण्यात आल्या होत्या. त्यात शिधावाटप केंद्र, विलगीकरण केंद्र, निरंतर सर्वेक्षणासाठी शिक्षकांच्या सेवा संलग्नित केल्या होत्या. त्या पूर्ण झाल्यानंतर चालू शैक्षणिक सत्रात शाळा अजूनपर्यंत सुरू झालेल्या नाहीत. शासन परिपत्रक निघून एक महिना उलटूनही अद्याप काही शाळांत दांडी मारलेली दिसते.या ठिकाणी दिल्या भेटीतालुक्यातील गलवाडे, झाडी, लोण, मुडी, तरवाडे, शिरसाळे, ढेकूसीम या गावांना भेटी दिल्या. त्यात ढेकूसीम येथे शिक्षिका उपस्थित होत्या, तर शिरसाळे येथेही शिक्षिका उपस्थित होत्या. तरवाडे येथे शाळा बंद होती. गलवाडे येथे शाळा बंद होती. झाडी येथे शिक्षक उपस्थित होते. लोण येथेही शिक्षक उपस्थित होते, तर मुडी येथे शाळेत कुत्रे बसलेले होते. केंद्रप्रमुखांना तंबीज्या केंद्रातील शिक्षक गैरहजर असतील त्या केंद्रप्रमुखांनादेखील तंबी दिली जाणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन यांनी दिली. तसेच ज्या शाळा बंद असतील तेथील मुख्याध्यापक व शिक्षकांना नोटीस पाठवून चौकशी करून अहवाल मागवला जाईल.-आर.डी.महाजन, गटशिक्षणाधिकारी, अमळनेरजि.प. शाळांमध्ये ५० टक्केही उपस्थिती नाही, ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांना दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 2:01 PM