जिल्ह्यातील आठ ग्रामसेवकांवर झालेल्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करून जिल्हाधिकारी कारवाई करतात. मग, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी काय करतात, असा मुद्दा सदस्य नानाभाऊ महाजन यांनी उपस्थित केला. ग्रामविकास निधीच्या वसुलीबाबत काय कार्यवाही केली, अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. ५६ ग्रामसेवकांना नोटिसा बजावल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांनी सांगितले.
अन् गोंधळाला सुरुवात
साठवण बंधाऱ्यांबाबत धरणगाव पं.स. सभापती मुकुंद नन्नवरे प्रश्न उपस्थित करीत असतानाच सभापतींना येथे निधी नसतो, अशी प्रतिक्रिया नंदकिशोर महाजन यांनी देताच गोंधळाला सुरुवात झाली. चार ते पाच सभापती उभे राहून विरोध करू लागले. यावेळी सदस्य विरुद्ध सभापती असे चित्र निर्माण झाले होते. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता.
छापखान्याचा अखेर विषय
छापखाना सुरू करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात पुन्हा एकदा सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यात आली. मात्र, आधी झालेल्या ठरावांची अंमलबजावणीच होत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.