8 वर्षाची असताना घशात अडकलं होतं 1 रूपयाचं नाणं, 13 वर्षानी डॉक्टरांनी काढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 10:05 AM2024-01-11T10:05:00+5:302024-01-11T10:05:56+5:30

सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे हे नाणं कधी घशात अडकवं आणि ते कसं काढलं.

1 rupee coin stuck in girl food pipe down throat 13 year ago in Ujjain | 8 वर्षाची असताना घशात अडकलं होतं 1 रूपयाचं नाणं, 13 वर्षानी डॉक्टरांनी काढलं

8 वर्षाची असताना घशात अडकलं होतं 1 रूपयाचं नाणं, 13 वर्षानी डॉक्टरांनी काढलं

Ujjain News: उज्जैनच्या एका खाजगी हॉस्पिटलमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इंदुर येथील एक 21 वर्षीय युवती परिवारासोबत उज्जैनच्या एका हॉस्पिटलमध्ये पोहोचली. इथे डॉक्टरांना दिसलं की, तिच्या अन्ननलिकेजवळ एक रूपयाचं नाणं अडकलं आहे. हे नाणं काढण्यासाठी डॉक्टरांनी सर्जरी करण्याचं ठरवलं. डॉक्टरांच्या टिमने यशस्वी ऑपरेशन केलं आणि 1 रूपयाचं नाणं काढलं. पण सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे हे नाणं कधी घशात अडकवं आणि ते कसं काढलं.

ही मुलगी 8 वर्षांची होती तेव्हा तिच्या घशात हे एक रूपयाचं नाणं अडकलं होतं. 13 वर्ष कोणतीही समस्या न होता आनंदात राहणारी ही मुलगी आता 21 वयात हे नाणं काढण्यासाठी पोहोचली तेव्हा सगळेच हैराण झाले.

21 वर्षीय नाजमीनचे वडील फारूक यांनी सांगितलं की, ते इंदुरमध्ये राहतात आणि मजुरी करतात. माझी मुलगी नाजमीन जेव्हा 8 वर्षाची होती तेव्हा तिच्या हट्टामुळे मी तिला 1 रूपयाचं नाणं चॉकलेट आणण्यासाठी दिलं होतं. मुलीने त्यावेळी नाणं तोंडात टाकलं आणि गिळलं. 

मुलीने उलट्या केल्या आणि त्यानंतर तिला बरं वाटलं. आम्हाला वाटलं की, नाणं निघालं असेल. त्यामुळे आम्हीही फार लक्ष दिलं नाही. आता समजलं की, नाणं तर घशात अन्ननलिकेत अडकलं आहे. जे ऑपरेशन करून काढण्यात आलं.

नाजमीनचे वडील फारूक म्हणाले की, मुलीचं वजन कमी होत चाललं होतं. एक-दोन ठिकाणी एक्स-रे सोनोग्राफी केली तर समजलं की, घशाखाली अन्ननलिकेत काहीतरी अडकलं आहे. तेव्हा तिच्या बालपणी घडलेली घटना आठवली आणि लगेच मुलीचं ऑपरेशन करण्यात आलं. 

Web Title: 1 rupee coin stuck in girl food pipe down throat 13 year ago in Ujjain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.