श्वान हा पृथ्वीवरील सर्वात विश्वासू प्राणी समजला जातो. ठिकठिकाणी त्याची उदाहरणंही बघायला मिळतात. श्वान हा माणसाचा अतिशय चांगला आणि जवळचा मित्र असतो. पण कधीकधी ही मैत्री मिळवण्यासाठी अनेकांना लाखोंची रक्कम खर्च करावी लागते. खेडे गावांमध्ये श्वान पाळण्याचा विचार केला तर ते फुकटात होईल. पण अलिकडे शहरांमध्ये श्वान पाळण्याची क्रेझ पाहता जागतिक बाजारात तुम्ही विचारही केला नसेल इतक्या महाग श्वानांची खरेदी केली जाते. महत्वाची गोष्ट म्हणजे श्वान पाळण्याची आवड असणारे लोक या किंमतीची पर्वा करत नाही.
1. Lowchen :
या जातीचे श्वान जगात सर्वात जास्त महागडे असतात. यांची किंमत तर तशी जवळपास ४ लाख ६५ हजार इतकी आहे. मात्र, महागडी ट्रेनिंग आणि त्यांच्या काही खास गोष्टींमुळे या श्वानांची किंमत कोटींच्या घरात जाते. यांना लिटील लायन डॉग आणि ट्वॉय डॉग असेही म्हटले जाते.
2. Rottweiler :
या जातीच्या श्वानांची जगात सगळीकडेच मोठी क्रेझ बघायला मिळते. या श्वानांची किंमत ४ लाख ६५ हजारांपासून सुरू होते.
3. Samoyed :
समोएड जातीच्या श्वानांची किंमत ४ लाख ३२ हजारांपासून सुरू होते. या श्वानांनाही जगात मोठी मागणी आहे.
4. German Shepherd :
महागड्या श्वानांच्या यादीत जर्मन शेफर्ड श्वानांचाही समावेश आहे. यात कुणाला काहीच शंका नसेल की, यांची किंमतही लाखांच्या घरात आहे.
5. Canadian Eskimo Dog :
कॅनेडियन एस्किमो जातीच्या श्वानांची किंमत ३ लाख ९९ हजार रूपयांपासून सुरू होते.
6. Tibetan Mastiff :
या जातीचे श्वान खूप शानदार असतात. या श्वानांची किंमत ३ लाख ३२ हजार पासून सुरू होते.
7. Chinese Crested Hairless :
लाखो रूपयांना विकले जाणारे या जातीचे श्वान खूप समजूतदार आणि आक्रामक मानले जातात.
8. Akita :
या श्वानाचं नाव जितकं सुंदर तितकेच ते दिसण्यातही सुंदर असतात. यांची किंमत २ लाख ३२ हजार पासून सुरू होते.
9. Pharaoh Hound :
यूरोपियन देश मालतामधी ही प्रजाती आहे. फराहो हाऊंड श्वानाचं शरीर लांब आणि सडपातळ असतं. हा श्वान बरीच लांब उडी घेऊ शकतो. याची किंमत २ लाख रूपयांपासून सुरू होते.
10. Chow Chow :
चाऊचाऊ नावच्या या श्वानाचीही किंमत जवळपास २ लाखांपासून सुरू होते.