कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे अनेकांचे आयुष्यचं बदलून गेले आहे. कोरोना काळात माणूसकिची परिक्षा घेत असलेल्या अनेत घटना घडल्या. कोरोनाच्या माहामारीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सर्वसामान्य माणसं, समाजातील सधन लोक, लहान मुलं हे आपापल्यापरीने कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत होते. काही लहान मुलांनी आपले जमवलेले पैसे स्वतःच्या इच्छेने मुख्यमंत्री साहायता निधीला दिल्याच्या अनेक घटना तुम्हाला माहीत असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मुलीची कहाणी सांगणार आहोत.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर हे प्रभावी शस्त्र बनले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत कोरोनाची लस किंवा औषध उपलब्ध होत नाही. तोपर्यंत लसीचा वापर करणं अनिवार्य आहे. कर्नाटकातील एका १० वर्षाच्या मुलीने आपल्या एका हाताने मास्क शिवून शाळेतील मुलांन वाटले आहेत. सोशल मीडियावर या मुलीच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल. चिमुरडीने दाखवलेल्या हुशारीमुळे लोकांना या फोटोवर कंमेंट् आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी अंपग असून उड्डीप्पीची रहिवासी आहे. विशेष म्हणजे अपंग असूनही या मुलीने लोकांमध्ये मास्कचे वाटप केले आहे. सिंधुरीने एसएसएलसीची परिक्षा देण्यासाठी आलेल्या मुलांना हे मास्क दिले आहेत. रिपोर्टनुसार सिंधुरीने आपल्या एका हाताने अनेक मास्क तयार केले आहेत. जन्मल्यापासूनच सिंधूरीच्या कोपराच्या खालचा हात नव्हता. कोरोनाच्या संकटकाळात मास्क तयार करत असल्यामुळे सिंधुरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ही मुलगी सहावीला असून स्काऊट गाईडमध्येही सक्रिय आहे. एक लाख लोकांसाठी मास्क तयार करण्याचा सिंधुरीचा प्रयत्न आहे.
कधी जगातील सर्वात सुंदर राष्ट्राध्यक्षा म्हणून गाजली होती कोलिंडा, पण सध्या ती काय करते...?
चॅलेन्ज! या फोटोत लपली आहे पाल; शोधून शोधून थकाल, बघा जमतंय का?