शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
2
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
3
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
4
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
5
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
6
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
7
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
8
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
9
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
10
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
11
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
12
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
13
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
14
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
15
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
16
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
17
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
18
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
19
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
20
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

बाबो! १००व्या वर्षी आजोबा चढले बोहल्यावर, नवऱ्यामुलीचं वय वाचून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 3:41 PM

शंभराव्या वाढदिवसी काहीतरी खास करायचं असं त्यांच्या नातवंडांनी ठरवलं होतं. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या विश्वनाथ सरकार यांनी बुधवारी आपली ९० वर्षीय पत्नी सरोधवानी यांच्यासोबत भव्य विवाह केला.

लग्न हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा क्षण असतो, असं म्हटलं जातं. अनेकदा लग्नाच्या अतिशय रंजक (Unique Marriage Stories) आणि कधीकधी हैराण करणाऱ्या घटनाही आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळतात. मात्र, आज जी घटना समोर आली आहे ती अतिशय आगळीवेगळी आहे. यात एका व्यक्तीने आपला १०० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या पत्नीसोबत दुसऱ्यांदा लग्न केलं . त्यांच्या शंभराव्या वाढदिवसी काहीतरी खास करायचं असं त्यांच्या नातवंडांनी ठरवलं होतं. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या विश्वनाथ सरकार यांनी बुधवारी आपली ९० वर्षीय पत्नी सरोधवानी यांच्यासोबत भव्य विवाह केला.

या वृद्ध दाम्प्त्याची सून गीता सरकारने सांगितलं की, 'ही कल्पना तेव्हा सुचली जेव्हा काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर असंच काही पाहिलं. यानंतर मी कुटुंबातील इतर सदस्यांनाही याबद्दल सुचवलं आणि सगळ्यांना ही कल्पना आवडली'. या कपलचं लग्न १९५३ साली झालं होतं. या कपलची मुलं, नातवांडं आणि परतवांडं इतर राज्यांमध्ये राहतात. मात्र, या लग्नासाठी त्यांनीही हजेरी लावली. (Old Man Married at Age of 100)

या कपलच्या नातंवांडांमधील एक पिंटा मोंडोलने म्हटलं की नवरी नवरदेवाच्या कुटुंबात येते, त्यामुळे आम्ही त्यानुसारच प्लॅनिंग केलं. यानुसार आजोबांनी आपल्या गावातील घरी ठेवण्यात आलं. तर आजीला लग्नाच्या दोन दिवस आधी शेजारच्या गावातील घरी ठेवलं गेलं.

नातींनी ९० वर्षाच्या नवरीला तयार होण्यासाठी मदत केली. तर नातू आजोबांना तयार करत होते. विश्वनाथ सरकार बुधवारी आपल्या नवरीला आणण्यासाठी तिच्या घरी घोडीवर बसून गेले. नवरदेव तिथे पोहोचताच फटाके फोडण्यात आले. दोघांनाही अगदी नवरी-नवरदेवाप्रमाणे सजवलं गेलं होतं. लग्नासोबतच भोजनाची व्यवस्थाही केली गेली होती आणि यासाठी शेजाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आलं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेwest bengalपश्चिम बंगालmarriageलग्न