(Image Credit- Humans of bombay)
असं म्हणतात की, आपल्या सगळ्यानाच वेळेबरोबर बदलायला हवं. काही लोकांसाठी आपले विचार बदलून नव्या विचारानं चालणं कठीण असतं. ५५ ते ६० वयोगटाच्या पुढील लोक नेहमीच त्यांच्या काळातला विचार करत असतात. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या आजी खूपच मॉर्डन असून काळासोबत बदलण्याच्या विचाराच्या आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही पण वयाच्या १०० व्या वर्षीसुद्धा या आजी एकदम फिट, हेल्दी आहेत. याचं सिक्रेट सांगताना आजी म्हणतात मी नेहमी जगा आणि जगू द्या या तत्वावर चालते. माझ्या नातवडांबरोबर मौजमजा करते.
ज्या घरांमध्ये ज्येष्ठ लोक असतात. त्याठिकाणी देवाचा वास असतो. कारण मोठे लोक नेहमी आशिर्वाद देतात. अनेकदा लोक घरातील वयस्कर माणसांकडे दुर्लक्ष करतात. कारण त्यांना असं वाटतं. की त्यांचे विचार जुने आहेत.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या आजी मॉडर्न विचारांच्या आहेत. ह्यूमन्स ऑफ बॉम्बे या पेजवर आजीची स्टोरी व्हायरल होत आहे.
वाह, शाब्बास! लॉकडाऊनच्या काळात दोन भावंडांनी लिहिले २१०० पानांचे रामायण
१९२० मध्ये या आजी महात्मा गांधींच्या स्वतंत्रता आंदोलनाचा भाग होत्या. हिटलरची हुकूमशाहीसुद्धा त्यांनी जवळून पाहिली आहे. आपल्या कुटुंबाबरोबर आपली कहाणी शेअर केली आहे. जगा आणि जगू द्या तत्वावर चालल्यानं मी आनंदी आणि फिट आहे. असं या आजी म्हणतात. त्यांचे नातवंड नेहमी फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. या आजींची ५ लहान मुलं आणि १० नातवंड आहेत. आपला वाढदिवस ते प्रत्येकाबरोबर साजरा करतात. मुलांसोबत पिज्जा पार्टी असो किंवा बर्गर सगळं काही खायला या आजी तयार असतात. मुलांनाही आजींची कंपनी खूप आवडते.
भारीच! चौथीलाच शाळा सोडली; अन् आता ८३ वर्षीय आजोबांनी तयार केली ४ भाषांची डिक्शनरी
''माझ्यासोबतच्या महिला मला गरजेपेक्षा जास्त फॉरवर्ड असल्याचे म्हणतात. मुलं आणि नातवंडांना मी खूप सुट दिली आहे. असं त्यांना वाटतं पण बदलत्या काळात आपल्या सगळ्यांनाच बदलायलाच हवं. '' असं आजींना वाटतं. आजींच्या विचारांमुळे अनेकजण त्यांचे कौतुक करतात. तर कोणाला हे विचार पटत नाहीत. या आजींनी आपल्या मुलाच्या आंतरजातीय विवाहाला परवानगी दिली होती. आता संपूर्ण कुटुंब आनंदात राहत आहे.