रेल्वेचा हॉर्न कसा वाजतो हे तर सगळ्यांना बालपणापासून माहीत असतं. लहान मुलेही खेळताना रेल्वेच्या हॉर्नचा आवाज काढतात. सगळ्यांना हेच माहीत आहे की, रेल्वेचा हॉर्न एकसारखाच वाजवला जातो. पण हे सत्य नाहीये. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, भारतीय रेल्वेमध्ये ११ प्रकारच्या हॉर्नचा वापर केला जातो आणि या प्रत्येक हॉर्नला एक अर्थ असतो. चला जाणून घेऊन याबाबत माहिती.
छोटा हॉर्न
जर चालकाने एकदा छोटा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, ट्रेन यार्डमध्ये जाण्यासाठी तयार आहे. तसेच जर चालकाने दोनदा छोटा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, चालक गार्डला ट्रेन सुरू करण्याचा संकेत मागत आहे.
छोटा हॉर्न तीन वेळा
जर ट्रेन चालवताना चालकाने तीन वेळा छोटा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, ट्रेन नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि याने गार्डला संकेत दिला जातो की, त्याने त्याच्या डब्यातील व्हॅक्यूम ब्रेकचा वापर लगेच करावा. त्यासोबतच जर ट्रेन सुरू असताना अचानक थांबली आणि अशात चालकाने चारवेळा छोटा हॉर्न वाजवला तर समजून घ्या की, इंजिनमध्ये बिघाड आहे आणि गाडी पुढे जाऊ शकणार नाही किंवा काही दुर्घटना झाली आहे.
मोठा हॉर्न आणि छोटा हॉर्न
जर चालकाने एकदा मोठा हॉर्न आणि एक छोटा हॉर्न वाजवला तर याने गार्डला संकेत दिला जातो की, एकदा गाडी सुरू होण्यापूर्वी त्याने ब्रेक पाइप सिस्टीमची तपासणी करावी. तसेच जर चालकाने दोन मोठे आणि दोन छोटे हॉर्न वाजवले तर याचा अर्थ होतो की, गार्डने इंजिनकडे यावं.
मोठा हॉर्न
जर चालकाने पुन्हा पुन्हा मोठा वाजवला तर याचा अर्थ होतो की, गाडी कोणत्याही स्टेशनवर न थांबता पुढे जाणार आहे. त्यासोबतच जर चालकाने थांबून थांबून मोठा हॉर्न वाजवला जर याचा अर्थ होतो की, गाडी रेल्वे फाटकाला क्रॉस करत आहे. असं करून रस्त्यावरील लोकांना दूर राहण्याचा संकेत दिला जातो.
एक मोठा आणि एक छोटा हॉर्न
जर चालकाने एक मोठा आणि एक छोटा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, रेल्वे विभागली जात आहे. त्यासोबतच चालकाने दोन छोटे आणि एक मोठा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, कुणीतरी आपातकालीन चेन ओढली आहे किंवा गार्डने व्हॅक्यूम ब्रेक लावला असेल. तसेच जरक चालकाने ६ वेळा छोटा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, पुढे काहीतरी मोठा धोका आहे.