लिमा - पेरूमधील वाळवंटी प्रदेशात पृथ्वीवरील पुरातत्वशास्त्रज्ञांना सुमारे 2200 वर्षे जुन्या मांजरीचं मोठं रेखाचित्र (Geoglyphs) आढळलं आहे. मांजरीची आकृती ही तब्बल 121 फूट लांब असून ती नाज्का संस्कृतीचा भाग असल्याचं म्हटल जात आहे. आतापर्यंत या भागात अनेक मोठ्या आकाराच्या आकृत्या आढळल्या आहेत. अलास्काहून अर्जेंटिनाला जाणाऱ्या एका महामार्गाच्या जवळील एका डोंगराजवळ मांजरीची ही आकृती आहे.
नाज्का लायन्समध्ये आतापर्यंत 300 हून अधिक वेगवेगळ्या आकारांच्या आकृत्या आढळल्या आहेत. यामध्ये पशू आणि ग्रहांचा समावेश आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ जॉनी इस्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पर्यटकांसाठी बनवण्यात आलेले पॉईंट्स स्वच्छ करत असताना मांजरीचे रेखाचित्र आढळून आले. पर्यटकांना सहजपणे रहस्यमयी नाज्का लाइन्स पाहता यावेत यासाठी ही स्वच्छता करण्यात येत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी त्या काळातील लोकांनी कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाविना ही चित्रे तयार केली होती.
ड्रोनच्या मदतीने डोंगराच्या सर्व भागांचे छायाचित्र घेण्यास यशस्वी
फक्त आकाशातूनच ही चित्रे दिसू शकतात अशी माहितीही त्यांनी दिली आहे. इस्ला यांनी आम्ही रेखाचित्रांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची स्वच्छता करत असताना आम्हाला काही रेषा आढळल्या. या रेषा नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचे आढळून आले असं सांगितलं आहे. तसेच आणखीही काही ठिकाणी अशा प्रकारच्या रेषा असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मागील काही वर्षात आम्ही ड्रोनच्या मदतीने डोंगराच्या सर्व भागांचे छायाचित्र घेण्यास यशस्वी झालो असल्याची माहिती त्यांनी दिली.
मांजरीची आकृती 121 फूट लांबीची
पेरूच्या सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक आठवड्यांपर्यंत संरक्षण आणि स्वच्छतेची कामे केल्यानंतर मांजरीची आकृती दिसून आली. ही संपूर्ण आकृती 121 फूट लांबीची आहे. या मांजरीच्या आकृतीला इसवी सनपूर्व 2000 मध्ये तयार करण्यात आल्याची माहिती पुरात्वविभागाने दिली. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पेरूच्या या वाळवंटी प्रदेशात 140 नाज्का लाइन्स आढळून आल्या होत्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.