सेन फ्रांसिस्को - येथील रस्त्यावरून रविवारी एक 139 वर्ष जुनी दोन मंजली इमारत जाताना पाहून लोक हैराण झाले. यातील अनेकांनी हे दृष्य कॅमेऱ्यात कैद केले आहे. व्हिक्टोरियन हाऊस (Victorian house), असे या इमारतीचे नाव आहे. ही इमारत हायड्रोलिक आणि ट्रकच्या मदतीने नव्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आली आहे. (139 year old Victorian house Moved to new address in San Francisco videos and pics viral)
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसा, 5,170 स्क्वेअर फूट असलेले हे घर त्याचा मूळ पत्ता 807 फ्रँकलिन सेंटपासून 635 फुल्टन सेंटला हलविण्यात आले. हे ठिकाण जुन्या जागेपासून काही अंतरावरच आहे.
लढाई जगण्याची! विना जबड्याचा जन्माला आला हा मुलगा, व्यंगावर मात देत आज बनला आहे मोठा स्टार...
हे काम सोपे नव्हते -ही इमारत तिच्या मूळ जागेवरून दुसऱ्या ठिकाणी नेणे सोपे नव्हते. हे एक आव्हानात्मक काम होते. मात्र, अभियंत्यांनी हे काम अत्यंत काळजीपूर्वक आणि चोखपणे पार पाडले. कारण ही इमारत अथवा घर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाताना रस्त्यात झाडे, सिग्नल्स आणि पार्किंग मीटर्सचाही अडथळा होता.
भारीच! घराचं नाव 'इंडिओ', गल्लीचं 'विमानतळ'; पठ्ठ्यानं असं पूर्ण केलं आपलं स्वप्न, पाहा फोटो
बघणाऱ्यांची एकच गर्दी -शहरातील रस्त्यांवरून ही एतिहासिक इमारत जात असताना हे संपूर्ण दृष्य पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी रस्त्यावरून एखादी मिरवणूक चालली आहे, की काय, असे वाटत होते. या इमारतीला पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी नागरिकांनी गर्दी केली होती.
फोटोही व्हायरल - हे घर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवत असताना अनेकांनी या संपूर्ण कसरतीचे फोटोही काढले आहेत. व्हिडिओ प्रमाणेच हे फोटोही सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.