सोन्याचा धूर निघणाऱ्या भारताला इंग्रजांनी कशाप्रकारे लुटलं याचं उदाहारण म्हणजे एसएस गेरसोप्पा जहाज आहे. पुरातत्व विभागाने समुद्रात बुडालेल्या एसएस गेरसोप्पा जहाजाला शोधून काढलं होतं. ज्यात १४ अब्ज रूपये किंमती चांदी सापडली. एसएस गेरसोप्पा जहाज हे चांदी घेऊन दुसऱ्या महायुद्धा दरम्यान भारताच्या तत्कालीन कलकत्त्याहून ब्रिटनला जात होता. तेव्हा हे जहाज समुद्रात बुडालं.
डेली एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, डिसेंबर १९४० मध्ये दुसऱ्या महायुद्धा दरम्यान भारतातून ब्रिटनला जात असलेल्या एसएस गेरसोप्पा जहाजातील इंधन रस्त्यातच संपलं. हे जहाज भारतातून चांदी घेऊन ब्रिटनच्या आयरलॅंडला जात होतं. अशात एसएस गेरसोप्पा जहाजावर जर्मन यू बोटने अटॅक केला होता. ज्यामुळे हे जहाज समुद्रात बुडालं होतं.
८५ लोकांचा गेला होता जीव
त्यावेळी या एसएस गेरसोप्पा जहाजावर ८५ लोक उपस्थित होते. ज्यांना जलसमाधी मिळाली. जहाज डुबण्यासोबतच भारताचा हा खजिनाही समुद्राच्या तळाला गेला होता. दुसऱ्या महायुद्धा प्रत्यक्षपणे सहभागी नसतानाही भारतीयांसाठी हे मोठं नुकसान होतं.
नंतर २०११ मध्ये पुरात्व विभागाने समुद्रा बुडालेल्या एसएस गेरसोप्पा जहाजाला शोधून काढलं होतं. या जहाजावर १४ अब्ज रूपये किंमतीची चांदी सापडली होती. ही किंमती चांदी शोधून काढणारी टीम ओडसी मरीन ग्रुप रिसचर्सने सांगितले की त्यांनी आतापर्यंत जहाजातून ९९ टक्के चांदी काढली आहे. ओडसी मरीन ग्रुपचे अधिकारी ग्रेग स्टेम म्हणाले की, समुद्रात बुडालेल्या या जहाजातून चांदी काढणं कठिण होतं. चांदी एसएस गेरसोप्पा जहाजाच्या एका छोट्या कंपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आली होती. तिथे पोहोचणं फार अवघड होतं.
जर्मनीने या जहाजावर हल्ला केला कारण त्यांना दुसऱ्या महायुद्धा दरम्यान समुद्रामार्गे ब्रिटनचा बिझनेस थांबवायचा होता. जेणेकरून त्यांना कमजोर केलं जावं. त्यादरम्यान ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विंस्टन चर्चील यांनाही हिच भीती सतावत होती. दुसऱ्या महायुद्धा दरम्यान यूरोप आणि उत्तर अमेरिका यांच्यातील अटलाांटिक महासागराच्या जास्तीत जास्त भागांना जर्मन नेव्हीने ताब्यात घेतलं होतं. कोणत्याही देशाचं जहाज त्यावेळी जर्मन नेव्हीच्या नजरेतून वाचू शकत नव्हतं.
चांदीशिवाय जहाजावर आणखी काय?
एसएस गेरसोप्पा जहाजावर चांदीसहीत ७ हजार टन वजनाचं आणखीही काही सामान होतं. त्यात लोखंड आणि चहा पावडर होती. जर्मन नेव्हीने जेव्हा एसएस गेरसोप्पा जहाजावर हल्ला केला तेव्हा ते ८ नॉटच्या स्पीडने धावत होतं. हल्ल्यानंतर जहाज सर्व सामानासोबत समुद्रात बुडालं होतं.