काही लहान मुलांना माती खाण्याची सवय असते किंवा जिज्ञासेपोटी ते समोर दिसेल ती प्रत्येक वस्तू तोंडात टाकण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा ते विचित्र वस्तूही खातात. वय वाढण्यासोबत त्यांच्या या सवयी सूटतात. पण एका मुलाची माती खाण्याची सवय जेव्हा १४ वर्षापर्यंत सुटली नाही तर त्याच्या घरचे लोक चिंतेत पडले. यानंतर जे झालं ते हैराण करणारं आहे. कारण तो मुलगा ही सवय सोडण्यासाठी अजब काम करू लागला.
खाऊ लागला टूथब्रश आणि लोखंडाचे खिळे
परिवाराला वाटलं की, मुलावर भूताची सावली आहे. एका तांत्रिकाने सांगितलं की, लोखंडी खिळे आणि टूथब्रश खाल्ल्याने त्याची माती खाण्याची सवय सुटेल. यानंतर मुलाने लोखंडी खिळे आणि टूथब्रश खाणं सुरू केलं. ही घटना उत्तर प्रदेशातील आहे आणि मुलाचं नाव हरीश देवी आहे. जेव्हा त्याची हालत बिघडली तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
सर्जरीने काढण्यात आले ब्रश आणि खिळे
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, मुलाला पोटात असह्य वेदना झाल्यावर त्याला बाबा राघव दास मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी त्याचं चेकअप केलं आणि एक्स-रे रिपोर्ट पाहून डॉक्टर हैराण झाले. मुलाच्या पोटात बरेच टूथब्रश आणि खिळे दिसत होते. डॉक्टरांनी ऑपरेशन करून त्याच्या पोटातून १६ टूथब्रश आणि ३ इंच लांब लोखंडी खिळे काढले. ऑपरेशननंतर हरिशची स्थिती सुधारली आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की, काही दिवसात तो पूर्णपणे बरा होईल.
तेच हरिशच्या आई-वडिलांना वाटतं की, ब्रश आणि खिळे खाऊन त्यांच्या मुलावरील भूताची सावली दूर होत होती. त्यामुळे त्यांनी त्याला हे सगळं खाण्यासाठी प्रोत्साहित केलं. याआधीही अशा अनेक विचित्र घटना समोर आल्या आहे. अनेक मनोरूग्णांनी केस, खिळे, चमचे, काचा खाल्ल्याच्या घटना समोर आल्या. अनेकांना गंभीर नुकसानही झालं आहे.