कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी पार पडणारे ऑलिंपिकचे सामने पुढे ढकलण्यात आले आहेत. २३ जुलै पासून टोकियो ऑलिम्पिकला सुरूवात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वेळी खबरदारी घेण्यात आली असून एकमेकांशी हात मिळवण्यावर आणि गळाभेट घेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. परंतु एक आश्चर्यकारक बाब म्हणजे असे नियम असतानाही आयोजकांकडून मात्र स्पर्धकांना दीड लाख मोफत कंडोम वाटण्यात येणार आहे. जापान टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नियमावली जारी करण्यात आली. यामध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. टोक्यो ऑलिंपिकच्या पार्श्वभूमीवर ३३ पानांचं व्हायरस रूल बुक जारी करण्यात आलं आहे. तसंच यात सांगण्यात आलेले नियम मोडल्यात संबंधित स्पर्धकावर कारवाई करण्यात येणार असून त्यांना खेळातून बाहेरही काढलं जाईल. याव्यतिरिक्त प्रत्येक चार दिवसांनी खेळाडूंची कोरोना चाचणी घेतली जाणार असून ती पॉझिटिव्ह आल्यास त्या स्पर्धकाला यात सहभागी होण्यापासून मनाईदेखील केली जाणार असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. एप्रिल आणि जून महिन्यात या रूल बुकची समीक्षा करण्यात येणार आहे. तसंच आवश्यकता भासल्यास नियमांमध्ये बदलही करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ऑलिम्पिकसाठी जपानमध्ये येणाऱ्या खेळाडूंना ७२ तासांच्या आत आपला कोरोना अहवाल द्यावा लागणार आहे. तसंच जपानमध्ये आल्यानंतरही त्यांनी पुन्हा कोरोना चाचणी केली जाईल. परंतु कोणत्याही खेळाडूला क्वारंटाईन होण्याचा नियम लागू राहणार नसल्याचं यात स्पष्ट करण्यात आलं आहे. खेळाडूंना जिम, पर्यटनाच्या जागा, दुकानं, रेस्तराँ या ठिकाणी जाण्यावर बंदी असेल. खेळाडूंना केवळ सामन्यांच्या ठिकाणी आणि काही ठराविक जागीच जाण्याची परवानगी असेल. तसंच त्यांना मास्क परिधान करणंही अनिवार्य असेल. परंतु त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अनिवार्य असणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोना धोका कमी कण्यासाठी खेळाडूंना कमीतकमी वेळ जपानमध्ये ठेवण्यात येईल. जे खेळाडू ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहतील त्यांना फिजिकल कॉन्ट्रॅक्ट सही करावं लागणार नाही. दरम्यान, एएफपीनं दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंमध्ये दीड लाख कंडोम वाटण्यात येणार असल्याच्या वृत्ताला आयोजकांनी दुजोरा दिला आहे. याव्यतिरिक्त शक्य असल्यास त्यांनी कमी लोकांची भेट घ्यावी असंही आवाहन केलं जाणार असल्याचं आयोजकांनी म्हटलं.
Tokyo Olympic 2021 : हात मिळवण्यावर बंदी, पण स्पर्धकांना वाटले जाणार १५०००० कंडोम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 5:42 PM
Tokyo 2021 : आयोजकांकडून जारी करण्यात आलं एक रूल बुक
ठळक मुद्देआयोजकांकडून जारी करण्यात आलं एक रूल बुकदर चार दिवसांनी केली जाणार खेळाडूंची कोरोना चाचणी